Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूज

*जनतेच्या विश्वासाला न्याय देणारा जनता दरबार; ३४० नागरिकांच्या तक्रारींवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र

मुंबई : लोकशाही व्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या सामान्य नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेत त्या तातडीने मार्गी लावण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या अडचणी, तक्रारी आणि विविध विकासकामांशी संबंधित मागण्या प्रत्यक्ष मांडल्या. प्रत्येक नागरिकाचे म्हणणे संयमाने आणि गांभीर्याने ऐकून घेत प्रशासनाला त्वरित कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.

आजच्या जनता दरबारात सुमारे ३४० अर्ज प्राप्त झाले. प्रत्येक अर्जाची बारकाईने दखल घेत संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या समस्या केवळ कागदावर न राहता त्यांचे वेळेत, पारदर्शक आणि परिणामकारक निराकरण व्हावे, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलता, उत्तरदायित्व आणि तत्परतेने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.

जनता दरबार हा केवळ तक्रारी स्वीकारण्याचा उपक्रम नसून, शासन आणि जनतेमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणारा प्रभावी संवादाचा मंच ठरत आहे. शासनाच्या लोकाभिमुख धोरणांचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य नागरिक असून, त्यांच्या अडचणींना प्राधान्याने न्याय मिळवून देणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असल्याचा संदेश या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाला.

राज्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना न्याय मिळावा, शासकीय यंत्रणा अधिक जबाबदार आणि उत्तरदायी व्हावी तसेच जनतेच्या अपेक्षांची प्रभावी पूर्तता व्हावी, या उद्देशाने अशा जनता दरबारांचे आयोजन सातत्याने करण्यात येत आहे. नागरिकांच्या प्रश्नांचे त्वरित निराकरण, विकासकामांना गती आणि प्रशासनात पारदर्शकता या त्रिसूत्रीवर शासनाची वाटचाल सुरू असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले.

जनतेच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाला पात्र ठरणारे, लोकाभिमुख, पारदर्शक आणि संवेदनशील प्रशासन उभारण्याची बांधिलकी शासनाने पुन्हा एकदा अधोरेखित केली. समाजहित, न्याय आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी प्रशासन सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related posts

मा.सभागृहनेते रविंद्र इथापे यांची आयुक्तांकडे जोरदार मागणी

jantechasavdhanmaharashtra

*स्व.ह.भप.बाबामहाराजांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार ! मुख्यमंत्री यांचे प्रशासनाला सूचना*

jantechasavdhanmaharashtra

मनसे कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने कोपरखैरणे सेक्टर एक व दोन विभागातील दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याला सुरुवा

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment