Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजशहर

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई तर्फे सायकल रॅलीचे आयोजन

नवी मुंबई प्रतिनिधी

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत नवी मुंबई परिवहन कार्यालयमार्फत नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षापर जनजागृती करण्यासाठी विवीध उपक्रम राबविले जात आहेत. आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी कार्यालयमार्फत नवी मुंबई कार्यक्षेत्रात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅली वाहन तपासणी केंद्र,नेरुळ येथून प्रारंभ होऊन याच ठिकाणी  समाप्त करण्यात आली. सदर रॅली साठी सौ. हेमांगिनी पाटील मॅडम (उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,नवी मुंबई),श्री गजानन गावंडे साहेब (सहा.परिवहन अधिकारी) यांनी झेंडा दाखवून सायकल रॅलीची सुरुवात केली. या रॅली मध्ये नवी मुंबई शहरतील बहुसंख्य नागरिकांनी उत्तस्पूर्त सहभागी झाल्याचे दिसून आले. नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती प्रभावशाली होण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी. हेमंगीनी पाटिल मॅडम यांनी जनतेशी संवाद साधताना रस्ता सुरक्षाचे महत्व पटवून दिले. सदर रॅली साठी मोटर वाहन निरीक्षक श्री आशिष दरगोडे,सहायक मोटार वाहन निरीक्षक गणेश लव्हाटे,सूरज घोरपडे,अक्षय जाधव,मयूर जाधव आणि त्यांची टीम तसेच नवी मुंबई मधील विविध सायकल संघटना यांनी मोलाचे सहकार्य केले. सायकल रॅलीद्वारे इधनाची बचत, अपघातांना आळा, सामाजिक व शारिरीक स्वास्थ यांचे महत्त्व पटवून देताना मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. रस्ता सुरक्षा नागरिकांमध्ये प्रभावशाली राबवत असताना वाढते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंगिनी पाटिल मॅडम यांनी वर्षभर विविध उपक्रम जनतेसाठी राबविण्याचा प्रयत्न करीत असतात, त्यामुळे महाराष्ट्र राज्यात नवी मुंबई शहराचे अपघाताचे प्रमाण कमी होण्यात मोठी कामगिरी परिवहन कार्यालय यांनी केली आहे. या पुढे देखील विद्यार्थी , जनतेसाठी विविध चौक सभा, चित्रकला, आरोग्य शिबीर राबवत नागरिकांना चांगल्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न परिवहन कार्यालय नवी मुंबई मार्फत केला जाणार असल्याचे नमूद केले आहे.

परिवहन कार्यालय मार्फत सहभागी नागरिकांना प्रशस्तीपत्रक, सन्मान चिन्ह मेडल्स, रस्ता सुरक्षा संदेश देणारे टी शर्ट नागरिकांना वितरण करण्यात आले.

Related posts

सूर्योदय युवा प्रतिष्ठान” च्या माध्यमातून तृतीयपंथी समाजाकरीता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

jantechasavdhanmaharashtra

नवी मुंबईतून तडीपार असलेल्या गुन्हेगारानेच नवी मुंबईतून मोटरसायकल केल्या लंपास

jantechasavdhanmaharashtra

पारिजात को-ऑफ.क्रेडिट सोसायटी लि. ठाणे शाखा नुतन वास्तूत स्थलांतर सोहळा

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment