Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

तुर्भे पोलिसांकडून सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम राबवला

तुर्भे पोलिसांकडून सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम राबवला

तुर्भे – नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार ऑक्टोबर महिना ‘राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता महिना’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त तुर्भे पोलीस ठाण्याच्या वतीने महापे एमआयडीसी, पावणे एमआयडीसी, शिरवणे एमआयडीसी, तुर्भे एमआयडीसी, नेरूळ एमआयडीसी तसेच विविध हॉस्पिटल आणि इतर ठिकाणी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील तसेच इतर अधिकारी यांनी सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्यासाठी मार्गदर्शन केले. मोबाईल आणि इंटरनेटवरील फसवणूक, ऑनलाइन शॉपिंग, फेक लिंक, सोशल मीडिया फ्रॉड, फोनपे-गुगलपे व्यवहारातील फसवणूक, डिजिटल अरेस्ट, आणि ऑनलाइन ट्रेडिंग यांसारख्या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी नागरिकांना सायबर फसवणूक झाल्यास संपर्क करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक १९३० तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि इंस्टाग्राम पेजची माहिती देण्यात आली.

सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जागरूकता वाढत असून, अशा कार्यक्रमांचा दैनंदिन जीवनात मोठा उपयोग होत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. या जनजागृती मोहिमेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनीही समाधान व्यक्त केले.

Related posts

दिघागाव रेल्वे स्थानक सुरू करा… नाहीतर जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागेल – खासदार राजन विचारे*

jantechasavdhanmaharashtra

घणसोली नोड मध्ये नागरिकांना अनेक अडचणींना जावे लागते सामोरे ! अनेक नागरी सुविधा फक्त कागदावरच

jantechasavdhanmaharashtra

म रा मराठी पत्रकार संघ नवीमुंबईची कार्यकारणी जाहीर

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment