Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजसंपादकिय

*जुन्नरच्या कायदा-सुव्यवस्थेला सक्षम नेतृत्व; उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांचा जनतेचा सावधान महाराष्ट्रतर्फे गौरव*

*जुन्नरच्या कायदा-सुव्यवस्थेला सक्षम नेतृत्व; उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांचा जनतेचा सावधान महाराष्ट्रतर्फे गौरव*

प्रतिनिधी:- जनतेचा सावधान महाराष्ट्र

जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त समाजहित, कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा जपणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी जुन्नर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राचे मुख्य संपादक श्री. राजेंद्र बोडके यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी उपस्थित प्रतिनिधी कैलास बोडके

धनंजय पाटील यांनी जुन्नर तालुक्यात नियुक्तीनंतर कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रभावी कार्यपद्धती राबवली असून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारे अधिकारी म्हणून त्यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे. विविध धार्मिक उत्सव, सामाजिक कार्यक्रम आणि संवेदनशील परिस्थितींमध्ये शांतता व समन्वय राखत त्यांनी प्रशासनाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे.

विशेषतः गणेशोत्सव, पैगंबर जयंती आणि इतर धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर हिंदू-मुस्लिम ऐक्य, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी त्यांनी नागरिकांना केलेले आवाहन समाजात सकारात्मक संदेश देणारे ठरले. शांतता समिती बैठकीत त्यांनी नागरिक, गणेश मंडळे आणि सामाजिक संघटनांशी समन्वय साधत उत्सव शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले होते.

‘गणराया पुरस्कार २०२४’ वितरण सोहळ्यातही त्यांनी विविध गणेश मंडळांना सामाजिक बांधिलकी, शिस्त आणि आदर्श उत्सव व्यवस्थापनाबद्दल प्रोत्साहन दिले. अनंत चतुर्दशी विसर्जन मिरवणुकीदरम्यान उत्कृष्ट नियोजन करणाऱ्या मानाच्या गणेश मंडळांना त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले होते. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.

कायदा-सुव्यवस्था राखणे, संवेदनशील काळात प्रभावी बंदोबस्त उभारणे, सामाजिक तणाव टाळण्यासाठी संवादाची भूमिका मजबूत करणे आणि जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे या त्यांच्या कार्यपद्धतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

समाजाभिमुख व लोकहिताचे कार्य करणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सन्मान करणे ही जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राची सामाजिक बांधिलकी असल्याचे मुख्य संपादक श्री. राजेंद्र बोडके यांनी यावेळी सांगितले. जुन्नर तालुक्यातील नागरिकांमध्ये विश्वासार्ह व संवेदनशील अधिकारी म्हणून धनंजय पाटील यांनी निर्माण केलेली प्रतिमा ही पोलीस प्रशासनासाठी अभिमानास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related posts

2022:नवी मुंबई महापालिकेतील आरक्षण सोडत जाहीर! 50% जागा महिलांसाठी आरक्षित

नवी मुंबई पोलिसांनी करोडोचा गुटखा सप्लाय करणाऱ्या आरोपींना केले जेर बंद!

jantechasavdhanmaharashtra

*सायबर फसवणुकीवर नवी मुंबई पोलिसांचा प्रहार — १२ जणांच्या टोळीला अटक, देशभरातील ८८६ बँक खात्यांचा गैरवापर उघड*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment