Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हाब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

जांभळे गावच्या दोन जिवलग मित्रांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू.

प्रतिनिधी सतीश फापाळे

 

बदगी_ खामुंडी घाटात अपघात गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात.

गाडी अडीचशे फूट खोल दरीत कोसळली.

बदगी_खामुंडी घाटातील रस्त्याला संरक्षण भिंत बांधण्याची ग्रामस्थांची मागणी.

अकोले तालुक्यातील पठार भागातील जांभळे गावातील दोन जिवलग मित्र राहुल खंडू हुलवळे (वय ३२ वर्ष) आणि नवनाथ पोपट हुलवळे (वय ३५ वर्ष) हे दोघेही व्यावसायिक तसेच व्यापारी असून आपले काम आटपून ओतुरहून जांभळे गावी येत असताना सायंकाळी सहा ते सात वाजताच्या दरम्यान बदगी_खामुंडी घाटात आले असता स्कॉर्पिओ गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट अडीचशे फूट खोल दरीत कोसळली गाडी खोल दरीत कोसळल्याच्या आवाजाणे आणि माहिती मिळाल्याने पंचक्रोशीतील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि ओतूर पोलिस स्टेशनला खबर देण्यात आली.
यात नवनाथचा जागेवरच मृत्यू झाला तर राहुल गंभीर जखमी झाला असल्याने रुग्णवाहिकेतून आळेफाटा येथील हॉस्पिटलला नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला.त्यावर ओतूर पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करत दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यास ओतूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले होते .या घटनेने जांभळे गावावर शोककळा पसरली आहे.तर पंचक्रोशीतील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.
सोमवार सकाळी दहा वाजता दोन्ही जिवलग मित्रांचा अंत्यविधी झाला.राहुलच्या मागे त्याची पत्नी ,तीन वर्षाचा मुलगा ,एक वर्षाची मुलगी ,आई ,वडील ,भाऊ असे कुटुंब आहे तर नवनाथच्या मागे त्यांची पत्नी , पाच वर्षाचा मुलगा , दिड वर्षाची मुलगी ,आई वडील,भाऊ, असे कुटुंब आहे या दोन्ही कुटुंबावर राहुल आणि नवनाथच्या जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तरी सदर बदगी _खामुंडी घाटात रस्ता अरुंद आणि संरक्षक भिंत नसल्याने हा घाट धोकेदायक आहे.या घाटात वारंवार अपघात होतात.तरी प्रशासनाने लक्ष देऊन या घाटाची रुंदी आणि संरक्षक भिंती बांधण्याचे काम तातडीने करावे अशी मागणी राज गवांदे, कुमार हुलवळे,गणेश शिंगोटे, जयसिंग शिंगोटे ,
पांडुरंग शिंगोटे ,या स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

Related posts

*बेलापूर विभागात प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई*

*मालमत्ता करावरील २०० टक्के व्याजदर शास्ती कमी करण्याची मागणी; थकीत वसुलीसाठी अभय योजना राबविण्याचा प्रस्ताव*

म रा मराठी पत्रकार संघ नवीमुंबईची कार्यकारणी जाहीर

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment