Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

*सानपाड्यातील दोन जनहित प्रकल्प वर्षानुवर्षे अकार्यक्षम ! – निलेश कचरे यांचे १५ जुलैपासून लाक्षणिक उपोषण*

 


सानपाड्यातील दोन जनहित प्रकल्प वर्षानुवर्षे अकार्यक्षम – निलेश कचरे यांचे १५ जुलैपासून लाक्षणिक उपोषण


नवी मुंबई,  (प्रतिनिधी):
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सानपाडा विभागात जनतेच्या निधीतून उभारण्यात आलेले दोन महत्त्वपूर्ण प्रकल्प – सेक्टर ४ येथील दैनंदिन बाजार संकुल आणि सेक्टर ५ येथील सार्वजनिक व्यायामशाळा – मागील तीन ते पाच वर्षांपासून पूर्णत्वास गेलेले असूनदेखील अद्याप नागरिकांच्या सेवेसाठी खुले करण्यात आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाजी कचरे यांनी १५ जुलै २०२५ पासून शांततामय लाक्षणिक उपोषण सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

या प्रकल्पांसाठी लाखो रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च करण्यात आला असून, ते स्थानिक तरुणांसाठी रोजगार, महिलांसाठी सुरक्षित व्यवसायस्थळ आणि नागरिकांच्या आरोग्यवृद्धीसाठी व्यायामसुविधा उपलब्ध करून देणारे होते. मात्र, संबंधित यंत्रणांची उदासीनता व निष्क्रियता यामुळे हे प्रकल्प वर्षानुवर्षे अकार्यक्षम स्थितीत राहिले आहेत.

निलेश कचरे यांनी यासंदर्भात वेळोवेळी महानगरपालिका आयुक्त, विभागीय अधिकारी, तसेच लोकप्रतिनिधी व राज्य शासन यांच्याशी पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटी घेऊन पाठपुरावा केला. तथापि, कोणतीही ठोस कृती न झाल्याने त्यांनी लोकशाही मार्गाने उपोषणाचा निर्णय घेतला आहे.

कचरे यांची भूमिका स्पष्ट:

“ही कृती कोणाविरोधात नाही, तर लोकहितासाठी आहे. जनतेच्या सेवेसाठी उभारलेले प्रकल्प धूळखात पडले आहेत, ही लोकशाही व्यवस्थेची शोकांतिका आहे. मी एक जबाबदार नागरिक म्हणून समाजासाठी आवाज उठवत आहे,” अशी प्रतिक्रिया निलेश कचरे यांनी दिली.

प्रशासन व लोकप्रतिनिधींना विचारणीय प्रश्न:

  • खर्च केलेल्या निधीचा लाभ नागरिकांपर्यंत का पोहोचलेला नाही?
  • यंत्रणांकडून वेळेवर कृती का झाली नाही?
  • लोकप्रतिनिधींची भूमिका या प्रकरणात निष्क्रिय का ठरली?

हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून, संपूर्ण समाजाच्या हक्कांसाठीचा आहे. या शांततामय व कायदेशीर मार्गाने होणाऱ्या उपोषणाला समाजमाध्यमांनी व वृत्तपत्रांनी योग्य त्या पद्धतीने प्रसिद्धी देऊन लोकशाहीला बळकटी द्यावी, अशी नम्र विनंती निलेश कचरे यांनी केली आहे.


संपर्क:
निलेश सोमाजी कचरे
सामाजिक कार्यकर्ता – नवी मुंबई
📱 मोब.: ८७७९७३२०३३
📍 सानपाडा, नवी मुंबई


 

Related posts

नवी मुंबईचे शिल्पकार,माजी ठाणे जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर…

jantechasavdhanmaharashtra

कोपरखैरणे पोलिसांची पुन्हा एकदा मोठी कारवाई!160 लिटर गावठी दारू जप्त..

jantechasavdhanmaharashtra

*पालघर जिल्ह्यातील बालकांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य व पाणी पुरवठाप्रथम प्राधान्य देण्यात यावे वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक*

Leave a Comment