Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीय

विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ; नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित

 


विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ; नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित

मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले. ही कारवाई विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.

विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानांचा मुद्दा नाना पटोले यांनी उपस्थित केला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी करत जोरदार आक्रमक भूमिका घेतली. त्यावेळी सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला आणि कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले.

कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आपल्या जागांवरून उठून अध्यक्षांच्या आसनाजवळ गेले. यावेळी नाना पटोले यांनी राजदंडालाही स्पर्श केल्याने सत्ताधारी आक्रमक झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यास तीव्र विरोध दर्शवत, “पूर्वी अध्यक्षपद भूषवलेला व्यक्ती असे वर्तन करणे दुर्दैवी आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त केले.

यावरून गोंधळ अधिक वाढल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला. मात्र विरोधकांनी माफी मागण्याच्या मागणीवर ठाम राहत घोषणाबाजी सुरू ठेवली आणि अखेर कामकाजावर बहिष्कार टाकला.

विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीच निर्माण झालेला हा गोंधळ लक्षवेधी ठरला असून आगामी दिवसांत अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related posts

भाजपला बुडवायचे आणि लोकशाही वाचवायची, हाच देशातील जनतेचा निर्धार ! भास्कर जाधव

मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील नववीपर्यंतच्या शाळा बंद,

jantechasavdhanmaharashtra

ऑपरेशन ऑल आउट दरम्यान नवी मुंबई पोलिसांचा गुन्हेगारांवर पंच, तब्बल ३९० जणांवर कारवाई

Leave a Comment