Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

*ठाणे येथे पत्रकारांसाठी कार्यशाळा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि पत्रकारांना रेनकोट-व छत्री वाटपाचा भव्य कार्यक्रम संपन्न*

*ठाणे येथे पत्रकारांसाठी कार्यशाळा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि पत्रकारांना रेनकोट-व छत्री वाटपाचा भव्य कार्यक्रम संपन्न*

*ठाणे (प्रतिनिधी)*
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने ठाणे येथे भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत पत्रकारांसाठी प्रशिक्षण, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि पत्रकारांना छत्री व रेनकोट वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. ठाणे परिसरातील तसेच कोकण विभागातील अनेक पत्रकारांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून भरघोस प्रतिसाद दिला.

या वेळी प्रमुख उपस्थितीत संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, कार्याध्यक्ष दिलीप सपाटे, प्रदेश संपर्कप्रमुख नितीन शिंदे, कोकण विभागीय संपर्कप्रमुख अरुण बिराजदार हे मार्गदर्शनासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र बोडके यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील वरिष्ठ पत्रकारांना नियुक्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात नवी मुंबई पत्रकार संघटनेच्या नव्याने गठित कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यामध्ये कुंडलिक कानगुडे (उपाध्यक्ष), प्रवीण हांडे (सरचिटणीस), सुनील तावडे (कार्याध्यक्ष), आनंद पारठे (कोषाध्यक्ष), प्रशांत ससाने (सहसचिव), अरुण गुप्ता (संपर्कप्रमुख) यांचा समावेश असून, अनेक रियल पत्रकारांनी संघटनेत अधिकृत प्रवेश केला आहे.

राजेंद्र बोडके यांनी आपल्या भाषणात सांगितले, “वसंत मुंडे यांचे नेतृत्व हे पत्रकारांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. त्यांच्या संघर्षातून पत्रकारांच्या न्यायासाठीचे आंदोलन उभे राहिले. पत्रकारांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही एकजुटीने काम करणार आहोत.”

या वेळी बोलताना वसंत मुंडे यांनी स्पष्ट केले, “पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी मांडल्या जातील. आम्ही पत्रकारांचे हक्क आणि हित जपण्यासाठी कुठल्याही संघर्षास मागे हटणार नाही. पत्रकार हे समाजाचे प्रतिबिंब आहेत आणि त्यांचे कार्य समाजहितासाठीच असले पाहिजे. राजेंद्र बोडके यांच्यासारखे निष्ठावान कार्यकर्ते संघटनेला अधिक बळकट करतील, याची मला खात्री आहे.”

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थित सर्व पत्रकारांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करत पुढील कार्यशाळेसाठी उत्सुकता व्यक्त केली. या कार्यक्रमामुळे पत्रकारांची एकता आणि संघटनेचे उद्दिष्ट अधिक ठळकपणे अधोरेखित झाले.

Related posts

काँग्रेस का मागे पडत चाललीय? का नाना पाटोळे नेतृत्व करू शकत नाही?

*रबाळे पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा*

jantechasavdhanmaharashtra

*वाशी वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम; नियमभंगावर कडक कारवाई करत रस्ते सुरक्षेला प्राधान्य*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment