Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

वाहुतकीचे उल्लंघन काही दुचाकी चालक करत असल्याने नागरीकांना नाहक त्रास होत आहे!

 

प्रतिनिधी अमोल होजगे

वाहुतकीचे उल्लंघन काही दुचाकी चालक करत असल्याने नागरीकांना नाहक त्रास होत आहे

घणसोली डिमार्ट समोरील रस्त्यावर नो पार्किंग चा बोर्ड लावून सुध्दा सर्रास दुचाकीस्वार आपल्या दुचाकी पार्क करतात आणि डिमार्ट मध्ये तासंतास खरेदी करत असतात. बाजूला चौक असल्या कारणाने त्यातच बाजूला बस स्टॉप असल्या कारणाने बसेस पण भरपूर प्रमाणात ये-जा करत असतात. रोडवर दुचाकी पार्क केल्यामुळे डिमार्ट चे रिक्षास्टॅण्ड पण समोरच आहे पण दुचाकी पार्क होत असल्याने तेथील रिक्षा चालकांना नाईलाजाने रिक्षा दुसऱ्या लेन मध्ये उभ्या कराव्या लागतात.
त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते.

त्यात वाहतूक पोलिसांची टोइंग गाडी कधीतरी दिवसातून एखादवेळी येत असते पण दिवसातून एखादा वेळेस येऊन ही गोष्ट संपणारी नाहीये निदान त्याठिकाणी दिवसातून जमेल तितक्या फेरे वाढवून गाडी येजा करत राहिली की लक्षात येईल की ह्या भागात नो पार्किंग आहे. हे लोकांच्या लक्षात आले की लोक त्या ठिकाणी आपल्या दुचाकी पार्क करणार नाहीत. डिमार्ट ला स्वतःची पार्किंग सुविधा आहे तरीसुद्धा दुचाकी बाहेरच पार्क केल्या जातात.
त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ह्याठिकाणी योग्य ते कार्यवाही करावी जेणेकरून या ठिकाणी ये जा करणारे वाहनांना वाहतूक कोंडी व काही अपघात होणार नाही.

तसेच वाहतूक विभागाकडून घणसोली डी मार्ट चे प्रमुख अधिकारी यांना पत्र किंवा सूचना देऊन वाहतूक नियंत्रण साठी एक स्पेशल बॉडी गार्ड नेमावे जेणेकरून डी मार्ट ला खरेदी करणारे ग्राहक हे डी मार्ट च्या स्वतःची पार्किंग वापरतील आणि त्यामुळेही या ठिकाणी नागरीकांना होणारा त्रास ही कमी होऊ शकते, असं इथल्या नागरिकांच म्हणणं आहे लवकरात लवकर योग्य कार्यवाही झाली पाहिजे.

Related posts

उपप्रादेशिक कार्यालय नवी मुंबई तर्फे वाहन चालकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

jantechasavdhanmaharashtra

कल्याण-डोंबिवलीत पोलिसांचा गुन्हेगारीवर प्रहार उपायुक्त अतुल झेंडे यांच्या धडाकेबाज नेतृत्वात ११३ गुन्हेगारांना आळा

*रबाळे पोलीस स्टेशनच्या वार्षिक निरीक्षणादरम्यान पोलीस आयुक्तांचा नागरिकांशी थेट संवाद; अमली पदार्थविरोधी कारवाईसह सुरक्षाविषयक उपाययोजनांवर भर*

Leave a Comment