Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूज

कल्याण-डोंबिवलीत पोलिसांचा गुन्हेगारीवर प्रहार उपायुक्त अतुल झेंडे यांच्या धडाकेबाज नेतृत्वात ११३ गुन्हेगारांना आळा


कल्याण-डोंबिवलीत पोलिसांचा गुन्हेगारीवर प्रहार
उपायुक्त अतुल झेंडे यांच्या धडाकेबाज नेतृत्वात ११३ गुन्हेगारांना आळा

नवी मुंबई, (जनतेचा सावधान महाराष्ट्र)
कल्याण-डोंबिवली परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात मोहीम राबवून गुंडगिरीला जोरदार आळा घातला आहे. गेल्या दहा महिन्यांत परिमंडळ ३ अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्यांत सामील असलेल्या तब्बल ११३ जणांविरुद्ध मोक्का, एमपीडीए, तडीपारी आणि इतर कठोर कारवाया करून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

सोनसाखळी हिसकावणे, घरफोडी, लूटमार, बलात्कार, विनयभंग, खून, प्राणघातक हल्ले आणि शस्त्रांचा धाक दाखवून निर्माण केलेली दहशत अशा घटना सातत्याने वाढत होत्या. या पार्श्वभूमीवर उपायुक्त अतुल झेंडे यांच्या सूक्ष्म नियोजनाखाली आणि कठोर मार्गदर्शनात ऑल आऊट, कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. एका रात्रीतच ३५३ जणांची झडती घेऊन पोलिसांनी गुन्हेगारीला मोठा धक्का दिला.

कोळसेवाडी, महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा, तसेच डोंबिवलीतील रामनगर, विष्णूनगर, मानपाडा आणि टिळकनगर पोलीस ठाण्यांतून मिळालेल्या माहितीवरून ११३ जणांवर कारवाई करण्यात आली. तडीपारी अंतर्गत ३१ जणांना शहराबाहेर हद्दपार करण्यात आले असून, एमपीडीएअंतर्गत आठ जणांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. सर्वात मोठी कारवाई मोक्कांतर्गत झाली असून पाच गुन्ह्यांत ७४ आरोपींना तुरुंगात डांबण्यात आले आहे.

उपायुक्त अतुल झेंडे यांचे काम नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत प्रशंसनीय ठरले आहे. त्यांच्या कडक धोरणामुळे आणि परिणामकारक नेतृत्वामुळे परिमंडळ ३ मध्ये कायदा-सुव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. शून्य सहनशीलतेच्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करत त्यांनी पोलिस दलाला नव्या जोमाने कामाला लावले आहे. गुन्हेगारांमध्ये भीती आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे.

कल्याण-डोंबिवलीकरांनी या धडाकेबाज कारवायांचे स्वागत करत शहरातील शांतता आणि सुरक्षिततेबाबत विश्वास व्यक्त केला आहे.

Related posts

आळेफाटा पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा*

jantechasavdhanmaharashtra

*नेरूळ पालिकेतील काही कर्मचारी व अधिकारी बनलेत का फेरीवाले व मार्जिन स्पेस चे ठेकेदार नागरिकांचा प्रश्न?*

jantechasavdhanmaharashtra

अधिस्वीकृती संदर्भ पुस्तिकेचे* *माहिती महासंचालकांच्या हस्ते प्रकाशन*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment