Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

उपप्रादेशिक कार्यालय नवी मुंबई तर्फे वाहन चालकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

*उपप्रादेशिक कार्यालय नवी मुंबई तर्फे वाहन चालकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन*

नवी मुंबई प्रतिनिधी :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागा तर्फे रस्ता सुरक्षा नियंत्रण समितीकडून संपूर्ण राज्यात नेत्र तपासणी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत आहे या धर्तीवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई यांच्या माध्यमातून वाहन चालकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी वाहनचालकाच्या नेत्र तपासणी व संपूर्ण शारीरिक तपासणी शिबिराचे आयोजन नवी मुंबईच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली व सर्व अधीकारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने दिनांक-:०६-०८-२०२३ ते ०८-०८-२०२३ पर्यन्त शिबिराचे ठिकाण नेरूळ टेस्ट ट्रक ग्राउंड वंडर पार्क जवळ सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे तरी
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सर्व बस वाहन मालक / चालक यांना अवाहन करण्यात येते की, सदर आरोग्य शिबीरात जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा व रस्ता सुरक्षा नियंत्रण समिती व नवी मुंबई कार्यालयास सहकार्य करून आपलं आरोग्य सदृढ करावे असे आव्हान नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी नवी मुंबईतील सर्व वाहन चालक व मालक यांना केले आहे. हेमांगिनी पाटील यांनी नवी मुंबई परिवहन कार्यालयाचा चार्ज घेतल्यानंतर नवी मुंबई मधील परिवहन विभागाच्या अनेक समस्या सोडवण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत, मग त्या ऑनलाईन कामासंदर्भात, त्याचबरोबर कामाची गती वाढवली व अनाधिकृत वाहतूक, लोडिंग, अनलोडिंग व सुरळीत वाहतूक या सर्व समस्यांवरती नवी मुंबईमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले आहे, व नवी मुंबईकरांना येणाऱ्या परिवहन विभागाच्या समस्या त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवण्यात आल्या आहे महाराष्ट्रामध्ये महिला परिवहन अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून चांगली ओळख निर्माण केलेली आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, नवी मुंबई मधील अनेक महिला वाहन चालक, रिक्षाचालक व अनेक महिलांच्या परिवहन विभागाच्या अडचणी समजून घेऊन त्यांनी सोडवल्या आहेत, महिलांसाठी अबोली रिक्षा चालू करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे ,त्यामुळे महिलांनीही त्यांच्याबद्दल चांगल्या अधिकारी म्हणून आपल्या भावना व्यक्त केले आहे.
नवी मुंबईमध्ये अशा समाज उपयोगी गोष्टी परिवहन कार्यालयामार्फत राबवल्या जातात, याचे कौतुक सर्व नवी मुंबईकरांनी व शिवशक्ती वाहतूक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष:- संभाजी जाधव व परिवर्तन विद्यार्थी वाहतूक संघटना चे अध्यक्ष संतोष गोळे व संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील व त्यांचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले आहे.

Related posts

आदर्श भारत घडवण्याचे काम विद्यार्थी नक्कीच करू शकतात!.. विश्वासराव आरोटे

jantechasavdhanmaharashtra

*नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीत देशभक्तीचा जल्लोष*

अवजड वाहतूक उद्यापासून बंद?; ठाणे-नवी मुंबईतील निर्बंधांचा व्यवसायाला फटका

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment