Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमजिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

कोपरखैरणे पोलिसांकडून घरफोडी व पाणी मीटर चोरणारे अटकेत

*कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटकीकरण पथकाने 3 वेगवेगळ्या गुन्ह्यात 3 सराईत आरोपीतांना अटक करून 7 गुन्हे उघडकीस आणले बाबत*

कोपरखैरणे प्रतिनिधी:-

घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मा. पोलीस आयुक्त , मा. सह पोलीस आयुक्त, मा. पोलीस उपायुक्त परि १, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वाशी विभाग, वपोनि अजय भोसले, पोनि सुहास चव्हाण यांचे सूचना व मार्गदर्शन नुसार घरफोडीचे व पाणी मिटर चोरीच्या गुन्ह्याचे घटनास्थळाचे CCTV फुटेज व गोपनीय बातमीदाराच्या साह्याने साध्या वेशात सापळा रचून आरोपीतांस ताब्यात घेतले .

*उघडकीस आलेले गुन्हे*

1) कोपरखैरणे पोलीस ठाणे गु.र.क्र.२७६/२३, कलम 457, 380 भादवि. मध्ये आरोपीत शाहीद अर्शद शेख, वय २४ वर्षे.रा.ठी. सेक्टर १२ डी, बोनकोडे, खैरणे गाव, नवी मुंबई. यास अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी झालेले *एकुण ४ तोळे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले*.सदर आरोपीवर यापूर्वी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात ४ घरफोडीचे गुन्हे नोंद आहेत.

2) कोपरखैरणे पोलीस ठाणे गु.र.क्र.२८३/२३, कलम 457,454, 380 भादवि. मध्ये आरोपीत सरूद्दीन ताजुद्दीन शेख, वय 32 वर्षे ,रा.ठी.अमृतनगर, मुंब्रा, ठाणे जिल्हा यास अटक करून *त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, गुन्ह्यात वापरलेलं हत्यार, रोख रक्कम व त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला*. सदर आरोपी मेडिकल व दुकानांचे शटर उचकटून चोरी करण्यात सराईत असुन ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात 12 ते 15 गुन्हे नोंद आहेत.

3) रात्रीची घरफोडी करणाऱ्या व पाणी मीटर चोरी करणाऱ्या आरोपी प्रमोद मोहन कुमार वय 28 वर्षे रा. खैरणे पब्लिक ब्रिजचे बाजूला, खैरणे गाव, याचेकडून *पाणी मिटर व त्यांचे सुटे भाग जप्त करून 5 गुन्हे* उघडकीस आणले बाबत .

1) कोपरखैरणे पोलीस ठाणे
गु. र. क्र 270/23 कलम 379, 427 भा. द वि

2) 271/23 भा द वि 379,427

3) गु.र. क्र. 272/23 भादवी कलम 379,427

4) 273/2023 भादवी कलम 379,427

5) 274/23 भा द वि 379,427

*तपास पथक*
सपोनि दशरथ विटकर,
पोहवा/सचिन भालेराव,
पोहवा/ योगेश डोंगरे,
पोहवा/विनोद कांबळे,
पोहवा/राकेश पाटील,
पो ना/अमितकुमार तडवी,
पोशी/किरण बुधवंत,
पोशी/ निलेश निकम
पोशी/शंकर भांगरे,
पोशी/ राहुल डोंबाळे,

Related posts

वाशी प्लाझा सेक्टर 17 मधील हॉटेल गोल्डन सूट्स तसेच तेरझा लंग वर वाशी पालिकेची धडाकेबाज कारवाई

*कोपरखैरणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी – गावठी कट्टा व ६ जिवंत काडतुसांसह तिघा आरोपींचा पर्दाफाश*

आशाताई बुचके यांचा भाजप प्रवेश,आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला, भाजपाला विस्ताराची संधी:-..देवेंद्र फडणवीस

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment