*कोपरखैरणे पोलिसांची साखळी चोरी प्रकरणात मोठी कामगिरी — ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत*
नवी मुंबई (प्रतिनिधी) : कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या दोन साखळी चोरी प्रकरणांची उकल करून पोलिसांनी **₹५ लाख किंमतीचा मुद्देमाल** हस्तगत केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी ऋतिक उर्फ राज गोविंद मोरे (वय 26 वर्षे, रा. गुलमोहर बिल्डिंग, रूम नं. 404, सेक्टर 16, घणसोली, नवी मुंबई) यास ताब्यात घेतले.
अटक आरोपीकडून टीव्हीएस रेडर मोटारसायकल (किंमत ₹1,20,000)तसेच सोन्याचे मंगळसूत्र (३ ग्रॅम) आणि सोन्याची चैन (८ ग्रॅम) एकूण किंमत ₹3,80,000 असा मिळून ₹5,00,000 किंमतीचा मुद्देमाल** जप्त करण्यात आला आहे.
*उघडकीस आलेले गुन्हे:*
1. कोपरखैरणे पो.स्टे. गु.र.क्र. 255/25, बी एनएस. कलम 309(4)
2. कोपरखैरणे पो.स्टे. CR.NO 555/25,बी .एनएस कलम 309(4), 3(5)
पोलिसांच्या माहितीनुसार, या आरोपीविरुद्ध यापूर्वी वाशी, कफ परेड (मुंबई), नेहरूनगर, सीबीडी, सीआयडी ब्रांच, एनआरआय सागरी, टिळकनगर आदी पोलीस ठाण्यांत एकूण 11 गुन्हे नोंद आहेत. तसेच या प्रकरणातील दुसरा आरोपी **रेहान खान** याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणातील तपास आणि कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा. पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली पार पडली. त्यांनी प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच गुन्ह्याचा काटेकोर अभ्यास करून पथकाला स्पष्ट दिशानिर्देश दिले. त्यांच्या वेगवान निर्णयक्षमता, तपासातील अचूक धोरण आणि गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका यामुळे अवघ्या अल्पावधीत प्रकरण उघडकीस आले. या कामगिरीमुळे कोपरखैरणे पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक बळकट झाला आहे.

