Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*दिघा रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करायचे नसेल तर ती जागा लग्न समारंभ वाढदिवसासाठी भाड्याने देण्यात यावी!*

प्रतिनिधी :- लक्ष्मण पार्टे

दिघा रेल्वे स्टेशनचे काम सहा महिन्यापूर्वी पूर्ण झालेले असून रेल्वे चालू झालेली नाही.रेल्वे चालू झाले नसल्यामुळे दिघा वासियांचे हाल होत आहेत म्हणून  मा.नगरसेवक जगदीश गवते यांनी रेल्वे प्रशासनाला सूचना केली आहे. पंतप्रधान मोदी साहेब नवी मुंबईमध्ये मेट्रोचे उद्घाटन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत तरी त्याच दिवशी दिघा रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करावे अशी सूचना रेल्वे प्रशासनाला दिली आहे आणि जर दिघा रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करायचे नसेल तर ती रेल्वे स्टेशनची जागा लग्न समारंभ वाढदिवस वगैरे साठी भाड्याने देण्यात यावी अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे लेटरद्वारे दिली आहे तरी आता तरी रेल्वे स्टेशनचे उद्घाटन होत आहे का याकडे दिघा वासियांचे लक्ष वेधले आहे.

Related posts

*रबाळे एमआयडीसी पोलिसांचे धडाकेबाज कॉम्बिंग ऑपरेशन; देशी पिस्टल जप्त, 20 आरोपींवर गुन्हे*

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद २०२५ अनुषंगाने पोलीस उपाययोजना – पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, वाशी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय बैठक संपन्न

कवी कवितेतून तर पत्रकार बातमीतून समाजाचे प्रश्न मांडतात : वसंत मुंडे

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment