Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

यशोमंदिर पतसंस्थेचा 45 वा वर्धापन दिन सर्व शाखेप्रमाणे वाशी शाखेमध्ये ही मोठ्या उत्साहात साजरा

नवी मुंबई प्रतिनिधी

दिनांक 10 जानेवारी  यशोमंदिर पतसंस्थेचा 45 वा वर्धापन दिन सर्वच शाखेमध्ये साजरा करण्यात आला, यशोमंदिर पतसंस्थेला 45 वर्ष पूर्ण झाली व 500 कोटीचा समिश्र व्यवसाय पूर्ण केला संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री संकेत हुलवळे यांनी सांगितले की,या सर्व यशामध्ये संस्थेचे कर्मचारी,दैनंदिन ठेव प्रतिनिधी, सर्व संचालक माजी संचालक व कार्यकर्ते यांचा मोठा सहभाग लाभला त्यामुळे आम्ही संस्थेच्या यशाच्या शिखरावर पोहोचू शकलो, याचबरोबर मी संस्थेच्या सर्व सभासदांचेही मनापासून आभार व्यक्त करतो व धन्यवाद देतो की, आपणही या संस्थेच्या यशासाठी  सिंहाचा वाटा उचलला आहे तो म्हणजे कर्जदार व ठेवीदार रूपाने आपण संस्थेमध्ये व्यवहार केला त्यामुळेच सर्वांचे श्रेय हे अतिशय महत्त्वाचे आहे यापुढेही सर्वांच्या सहकार्याने यशोमंदिर चा हा यशाच्या डोंगर नक्कीच मोठ्या शिखरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण सर्व मिळून करू असे सांगितले

त्याचबरोबर संस्थेच्या सरव्यवस्थापका पदी आत्ताच नियुक्त झालेले भाऊसाहेब गवांदे यांनीही सर्व घटकाचे आभार व्यक्त करत संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही सर्वच श्रम घेऊन संस्था पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे व आपल्या सर्वांचे श्रेय आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे व संस्थेच्या कारभारामध्ये पारदर्शक कारभार आहे व यापुढेही राहील असे सांगण्यात आले

या अनुषंगाने वाशी शाखेमध्येही आज सकाळपासून अनेक कार्यकर्त्यांनी संचालकाने भेट देत संस्थेच्या वर्धापनादिनानिमित्त पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व एपीएमसी पोलीस वाहतूक विभागाच्या प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ विमल बिडवे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभागीय कार्याध्यक्ष व जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्र मुख्य संपादक राजेंद्र बोडके व हक्काचा आवाज या वृत्तपत्राचे संपादक प्रवीण हांडे

त्याचबरोबर एपीएमसी पोलीस वाहतूक विभागाच्या प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ विमल बिडवे यांनीही या वर्धापनादिनानिमित्त वाशी शाखेमध्ये येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत विमल बिडवे यांनी सांगितले की यशोमंदिर संस्थाही गरीब व गरजू लोकांसाठी व व्यवसायिकांसाठी अतिशय महत्त्वाची भूमिका घेऊन सर्वांना सहकार्य करते व अनेक उद्योजक घडवले त्यामुळे या संस्थेला 45 वा वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा व मला अभिमान आहे की या संस्थेत महिलांना सुद्धा स्थान देऊन चांगल्या हुद्द्यावर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी यशोमंदिर पतसंस्थेस अभिनंदन करते

राजेंद्र बोडके यांनी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना सांगितले की, यशोमंदिर या नावामध्येच यश आहे अनेक कुटुंबांना घडवले अनेक व्यावसायिक घडवले अनेक राजकीय लोक घडवले व अनेक सामाजिक संस्थांनाही मदत केली ही संस्था अनेक गोरगरिबांसाठी यशस्वीरित्या काम करणारी एक महाराष्ट्रातील आग्रगन्य नावाजलेली संस्था आहे या संस्थेमध्ये अनेक संचालक येऊन त्यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग संस्थेच्या हितासाठी केला व आता येणाऱ्या काळामध्ये नवीन युवा वर्गाला संधी दिल्याबद्दल संस्थेच्या सर्व हितचिंतकांना व सभासदांनाही धन्यवाद व संस्था स्थापन केल्यापासून ज्या कर्मचाऱ्यांनी संचालकांनी व सभासदांनी जे मोलाचे योगदान दिलं त्यामुळेच आज आपल्याला यशोमंदिर पतसंस्थेचा हा यशाच्या डोंगर आज पाहिला मिळाला आहे त्यामुळे स्थापनेच्या सुरुवातीपासून ज्या ज्या घटकांनी संस्थेची वाटचाल यशस्वी पार पाडली अशा सर्व घटकांना प्रथमता मी व माझ्या पत्रकार संघटनेच्या वतीने धन्यवाद देतो आणि असेच संस्थेच्या यशाचे शिखर निस्वार्थी भावनेने सर्व संचालक व कर्मचाऱ्यांनी यापुढील काळातही करावे अशा सदिच्छा आणि शुभेच्छा देतो

यानंतर संस्थेचे हितचिंतक व पत्रकार क्षेत्रात ज्यांनी आपला ठसा उमटवला असे प्रवीण हांडे यांनीही संस्थेच्या यशस्वी कामकाजाबद्दल सर्व संचालकांचे व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले व या पुढील काळातही आपण अशाच पद्धतीने निस्वार्थी भावनेने संस्थेचे कामकाज करावे व संस्थेला 1000 कोटी पर्यंतचे उद्दिष्ट  ठेवावे असे शुभेच्छा व्यक्त केल्या

वाशी शाखेच्या शाखा अधिकारी अलका बोडके  यांनीही आलेल्या सर्व सभासद कार्यकर्ते संचालक व मान्यवरांचे आपल्या कर्मचाऱ्यांना समावेत आभार व्यक्त करून सर्वांना सन्मानित करण्यात आले व असेच सहकार्य सर्वांचे आमच्या संस्थेला लाभावे अशी अशा व्यक्त केली

 

Related posts

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा: दुकानांच्या वेळा 8 वाजेपर्यंत, मुंबई लोकल बंदच!

jantechasavdhanmaharashtra

नागरीकांनी डोळ्यांची तपासणी तसेच काळजी घेणे आवश्यक-डॅा.प्रतिक तांबे

jantechasavdhanmaharashtra

नवी मुंबई – सानपाडा रेल्वे स्थानकावर बापानेच केली 4 वर्षीय मुलाची हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment