Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष ३, पनवेल यांनी हरवलेले २५ लाख रुपये किंमतीचे १२२ मोबाईल फोन नागरिकांना परत*

*गुन्हे शाखा कक्ष ३, पनवेल यांनी हरवलेले २५ लाख रुपये किंमतीचे १२२ मोबाईल फोन नागरिकांना परत*

पनवेल, दि. २६ सप्टेंबर : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत विविध पोलीस ठाण्यांत नागरिकांनी हरवलेल्या मोबाईल फोनबाबत प्रॉपर्टी मिसिंग तक्रारी दाखल केल्या होत्या. मोबाईलमध्ये जतन असलेले संपर्क क्रमांक, फोटो, व्हिडिओ व मेसेज यामुळे त्यांचा हरवणे हा केवळ आर्थिक तोटा नसून भावनिक विषय देखील ठरत होता. या तक्रारींचा पाठपुरावा करून **गुन्हे शाखा कक्ष ३, पनवेल यांनी तब्बल २५ लाख रुपये किमतीचे १२२ मोबाईल फोन शोधून काढून नागरिकांना परत केले आहेत.

गहाळ मोबाईल शोधण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या CEIR पोर्टलचा प्रभावी वापर करण्यात आला. मा. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह. आयुक्त . संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) . दिपक साकोरे, व उप आयुक्त (गुन्हे) . सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अविनाश काळदाते  यांनी विशेष पथक स्थापन करून शोधमोहीम राबवली. पोहवा/२०८२ इंद्रजित कानु  यांनी पोर्टलवरील माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून संबंधित सिमकार्ड धारकांशी संपर्क साधला. मागील तीन महिन्यांत महाराष्ट्र व परराज्यातून शोधलेले मोबाईल ,सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) श्री. अजयकुमार लांडगे, यांच्या हस्ते आज दिनांक २६/०९/२०२५ रोजी संबंधित धारकांना परत करण्यात आले.

या कामगिरीत सपोनि  पवन नांद्रे, पोउपनि अभयसिंह शिंदे, पोउपनि ,माधव इंगळे, सफौं अनिल पाटील, पोहवा रमेश शिंदे,प्रशांत काटकर,प्रमोद राजपुत,निलेश पाटील ,दिपक डोंगरे,सागर रसाळ,रुपेश पाटील, अजित पाटील,हिरकणी पाटील,पो.ना. आजिनाथ फुंदे,विनया पाटील, पो.शि. **लवंकुश शिंगाडे,विक्रांत माळी,प्रसाद घरत यांनी मोलाचे योगदान दिले.

या उल्लेखनीय कामगिरीबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, भविष्यातही पोलिसांकडून अशीच चांगली कार्यवाही सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Related posts

वाहुतकीचे उल्लंघन काही दुचाकी चालक करत असल्याने नागरीकांना नाहक त्रास होत आहे!

32 वर्षानंतर भाजपचा किल्ला ढासळला; कसब्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय

jantechasavdhanmaharashtra

समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या भूमी अभिलेख अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा ! वंचित बहुजन आघाडीची मागणी!

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment