प्रतिनिधी आनंद पार्टे
मुख्यमंत्री महोदय यांनी ठाणेकरांसाठी नवीन वर्षी जीव गमवण्यासाठी दिले गिफ्ट “डायघर डम्पिंग प्रकल्प” .
ठाणे: मुख्यमंत्री महोदय ठाण्यामध्ये मुंबईमध्ये विविध ठिकाणी डीप क्लिनिंग ड्राईव्ह करत असताना आपल्याला दिसून येत आहेत परंतु मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टायगर डम्पिंग जे पंचक्रोशीतील गावकऱ्यांसाठी त्यांनी नवीन वर्षामध्ये त्यांना भेटवस्तू म्हणून हे प्रकल्प जीव गमावण्यासाठी दिलेला असेल असे काही नागरिकांचे म्हणणे आहे. एकीकडे शहरी भागातील लोकांना सुसज्ज साफसफाई करण्याचे काम आणि दुसरीकडे ग्रामीण क्षेत्रात थोडक्यात येणाऱ्या लोकांसाठी जीव गमावण्यासारखे प्रकल्प इतका भेदभाव मुख्यमंत्र्यांकडून का होत आहे.
मुख्यमंत्री महोदय पूर्ण राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या ठाण्यामध्ये शहरी भागातल्या लोकांसाठी जी आज ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कचरे विल्हेवाट लावण्याची जी समस्या आहे त्यामध्ये असफल होत असताना दिसून येत आहे, त्यामुळे त्यांनी शहरी भागांना रहिवाशांना दुर्गंधीमुक्त करण्यासाठी डायगर डम्पिंग ग्राउंड ज्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे त्या ठिकाणी ग्रामीण भाग काही येत असेल परंतु तिकडे बरेच लोकवस्ती प्रकल्पाला सुद्धा मान्यता दिली असून लाखोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी राहत आहेत परंतु ग्रामीण भागातल्या रहिवाशी यांना मारण्यासाठी आणि शहरी भागातल्या नागरिकांना वाचवण्यासाठी हे जे काही मुख्यमंत्री असे भेदभाव करत असताना दिसून येत आहेत त्यामुळे संबंधित नागरिकांकडून पूर्णपणे नवीन वर्षासाठी नाराजगी व्यक्त होत आहे.
आज रोजी ३० डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यामध्ये वागळे स्टेट येथील काही भागांमध्ये डीप ट्रेनिंग ड्राईव्ह याचा शुभारंभ होत असून त्याचा नेमका काय उपयोग आहेत मुख्य म्हणजे संपूर्ण ठाणे शहरांमधून रोजचा जो काही हजार टन हे कचरा निघत आहे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जागा उपलब्ध होत नाहीये हे त्यांचे सगळ्यात मोठे अपयश आहे त्यांच्या अपयशामुळे पंचक्रोशीतील डायगर गाव असो देसाई गाव असो शिलफाटा भाग असो डोंबिवली लोधा पलावा हा परिसर असो इथे राहणारे सर्व लोकांचे जीव हे गमावण्यासाठी सज्ज राहावे थोडक्यात असा संदेश मुख्यमंत्र्यांकडून आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मुख्यमंत्र्यांच्या अपयशाला शेवटी ठाण्यातील या भागातले नागरिक यांना भोगावे लागेल असे दिसून येते
कोट
खरंतर मुख्यमंत्र्यांनी आज त्या ठिकाणी त्यांना राज्याचा नेतृत्व करण्यासाठी देवाच्या कृपेने आणि त्यांच्या नशिबाने ही संधी भेटली असून त्याचा इतका गैरवापर त्यांनी करू नये लोकांचे जीव जातील असे निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांचा जे काही नागरिकांच्या मनात चांगली व्यक्तिमत्त्व म्हणून प्रतिमा आहे त्याचा तिरस्कार व्हावा अशी कृत्य करू नये
डायघर ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ता
कोट
आम्ही अनेक आंदोलन या डायगर डम्पिंग ग्राउंड च्या विरोधात करत आहोत शेवटपर्यंत करत राहणार बऱ्याच लोकप्रतिनिधी यांना शासकीय अधिकारी यांना आम्ही या विरोधात पत्र व्यवहार केले असून अद्याप आम्हाला कोणत्याही प्रकारचा सकारात्मक उत्तर त्यांच्याकडून प्राप्त झाला नसून येत्या काळात आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यासाठी संबंधित सर्व पत्र व्यवहार हे तयार करून पुढील दाद माननीय न्यायालयामध्ये मागणार आहोत.
पंचक्रोशी अध्यक्ष संतोष पाटील
कोट
मुख्यमंत्री महोदय असो शासकीय अधिकारी असो त्या सर्वांना जागेचे कागदपत्र दाखवून सुद्धा त्यामध्ये कचरा प्रकल्पासाठी आरक्षण नसलेला भूखंड त्यांनी बेकायदेशीर पणाने त्यांच्या ताकतीचा गैरवापर करून हे नागरिकांवरती केलेला अन्याय आहे अशा कृत्याला मुख्यमंत्री असो त्यांची सुपुत्र असो जे खासदार आहेत या भागातले हे सर्वेश्वर जबाबदार आहेत म्हणून माननीय उच्च न्यायालय मध्ये हे सगळं प्रकरण कागदोपत्री सहित दाखल करण्यात येणार आहे त्यामुळे न्याय जर कुठे थोडाफार राहिला असेल तर ते न्यायालय या ठिकाणीच असावा त्यामुळे पुढचा पाऊल न्यायालयामध्ये योग्य प्रकारे मांडणार आहोत.
स्थानिक पत्रकार संपादक अरुण बिराजदार

