Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

नवी मुंबई महानगरपालिकेचे हे मोबाईल टॉयलेट आहे की होर्डिंगबाजी…

 

प्रतिनिधी अमोल होजगे

नवी मुंबई महानगरपालिकेचे हे मोबाईल टॉयलेट आहे की होर्डिंगबाजी

तुर्भे येथील सानपाडा हायवे रस्त्यालगत ज्या पद्धतीने ‘मोबाईल टॉयलेट’ म्हणून NMMT च्या ज्या बंद असलेल्या म्हणजेच वापरात नसलेल्या बसेस आहेत त्यांचा वापर छान अशा पद्धतीने आमदार मंदा म्हात्रे ह्यांच्या संकल्पनेने करण्यात आला आहे. लोकांसाठी खूप छान अश्या पद्धतीने हे सार्वजनिक शौचालय सुरू करण्यात आले, पण सध्या हे “मोबाईल टॉयलेट” फक्त मोठे होर्डिंग लावण्या पुरतेच ते कामाचे राहिले आहे असं म्हणावं लागेल.

कारण मूळ परिस्थिती जर सध्या पाहिली तर खूप बिकट अशी आहे आणि कोणीही ह्याचा वापर करू शकत नाहीये कारण ह्या टोयलेटची सफाईच केली जात नाहीये. दिलेल्या फोटोत सर्व परिस्थिती दिसून येतच आहे कुठे नळ तुटले आहे तर कुठे भांडे तुटले आहेत आणि आजूबाजूला बाटल्यांचा खच पडला आहे मात्र होर्डिंग खूप छान पद्धतीने दिसून येते आणि आतील परिस्थिती मात्र तितकीच बिकट आहे, नवी मुंबई महानगरपालिका ह्या कडे का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न येथील नागरिक विचारात आहे.

आमदार यांनी अशी कोणतीही योजना राबवताना नागरिकांचे पैसे म्हणजे ‘आमदार निधीचा’ वापर करून करत असतात पण त्याच नागरिकांना त्याचा योग्य पध्दतीने वापर होत नसेल तर आमदार महोदय यांचे प्रशासन आणि आयुक्त ह्यांना जाब विचारुन ते सुरळीत करून घेणे सुद्धा काम असत.असा प्रश्न नागरिक करत आहे.

Related posts

पत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे

jantechasavdhanmaharashtra

दिघागाव रेल्वे स्थानक सुरू करा… नाहीतर जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागेल – खासदार राजन विचारे*

jantechasavdhanmaharashtra

वाशी प्लाझा सेक्टर 17 मधील हॉटेल गोल्डन सूट्स तसेच तेरझा लंग वर वाशी पालिकेची धडाकेबाज कारवाई

Leave a Comment