Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

नवी मुंबई पालिकेचे अधिकारी प्रवीण गाडे हे कायदा पायदळी तुडवतात का?असा प्रश्न नागरिकांना पडत आहे 

 

सहसंपादक अरुण बिराजदार

नवी मुंबई पालिकेचे अधिकारी प्रवीण गाडे हे कायदा पायदळी तुडवतात का?असा प्रश्न नागरिकांना पडत आहे! 

नवी मुंबई:महापालिका क्षेत्रात अनेक प्रकारचे निविदा निघत राहतात परंतु ते सर्व निविदा महापालिकेचे काही अधिकारी त्यांच्या स्वफायद्यासाठी त्यांच्या स्वतःच्या कायद्याने निघत असतात असे अनेक वेळा दिसून येत आहे आणि नेहमी प्रमाणे शहर अभियंता यांना सुद्धा या बाबतीत पुरेपूर माहिती असते अनेक वेळा स्थानिक समाजसेवकांने ही गोष्ट आयुक्त यांच्या निदर्शनात आणून दिली आहे पण आयुक्त आणि शहर अभियंता कदाचित दुर्लक्ष करून नवी मुंबई च्या नागरिकांचे नुकसान आणि अधिकारी यांचे मोठे फायदे करून देण्यास तत्पर असतात. की काय असा प्रश्न नागरिकांना पडत आहे
आयुक्तांना सोबत या अगोदर चर्चा केली असता लवकरच या गोष्टीची दखल घेतली जाईल असे सांगण्यात आले पण त्या नंतरही पुन्हा तोच प्रकार घडत असताना दिसत आहे नक्की पालिका अधिकारी हे समाज हितासाठी काम करतात का स्वहितासाठी करतात हा प्रश्न जनते समोर उभा राहिला आहे

असेच दोन निविदा विद्युत विभागाने घणसोली च्या नागरी सुविधा केंद्र आणि कारंजे साठी विद्युत रोषणाई पुरवठा साठी काम काढले असून त्याबाबत माहिती घेत असताना असे आढळून आले जे काम विद्युत आणि किरकोळ कामकाज साठी आहे त्याकामासाठी गाडे महोदय यांनी चक्क बांधकाम संदर्भात असलेले नियम टाकून महापालिका अधिकाऱ्याने हे सिद्ध केले असावे महापालिका म्हणजे यांचे मालकीची आहे .

ज्या निविदा मध्ये विद्युत पुरवठा संदर्भात अट असायला पाहिजे त्यात त्यांनी ashpalt plant,आणि machinery मालकीची पाहिजे असे अट टाकलेत नेमकं शहर अभियंता करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे तरी संबंधित सर्व बाबी आयुक्त साहेबांकडे कागतोपत्री सहित दाखवून यावर त्याचे मत पुढच्या आठवड्यात घेण्यात जाणार असून आयुक्त यावर काय कारवाई करतात या कडे सर्व नवी मुंबईतील नागरिकांचे लक्ष लागले आहे

यावर आमच्या प्रतिनिधींनी यांनी संबंधित अधिकारी यांचे म्हणणे ऐकून घेतले असता त्यानी सांगितले की

कोट

आम्ही कोणतेही निविदे हे जीआर च्या अनुसरण न करत काढत नाही सर्व जीआर ला लागून निविदे काढतो हे घनसोलीतले दोन्ही काम कायदेशीर अटी बरोबर टाकलेले आहेत प्रवीण गाडे विद्युत विभाग

Related posts

माथाडी नेते स्व.अण्णासाहेब पाटील यांचा जीवनप्रवासावर चित्रपट

jantechasavdhanmaharashtra

थोर समाजसेवक व जांभळेगावचे आधारस्तंभ स्व.तबाजीदादा गवांदे यांचे सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान

*शाळेतील स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना – निकृष्ट कामाचा पर्दाफाश, जबाबदारांवर कारवाईची मागणी*

Leave a Comment