Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूज

चार महिन्यांपासून वाट चुकलेल्या वाटसरूला दिले मातेच्या हवाली.

*चार महिन्यांपासून वाट चुकलेल्या वाटसरूला दिले मातेच्या हवाली.

*सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके यांच्या प्रयत्नांना यश.

खामुंडी (ता. जुन्नर )येथील श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात एक नवखा इसम मानसिक रुग्णासारखे हावभाव करून फिरत असल्याचे खामुंडी येथील हॉटेल व्यवसायिक केशव क्षीरसागर यांची पत्नी पुष्पा, मुलगी निकिता आणि मुलगा ऋषिकेश क्षीरसागर याच्या निदर्शनास आले त्या इसमास काणाने ऐकू येत नव्हते तर व्यवस्थित बोलताही येत नव्हते परंतु म्हणतात ना संकटात अडकलेल्यांना नेहमी कुणीतरी देवासारखे धावून येत असते, अगदी तसाच प्रत्यय आला, ऋषिकेश क्षीरसागर यांनाही बोलता येत नाही,देवाच्या रुपात धाऊन आलेल्या ऋषीकेशने ही बाब अवलोकन केली व तोच त्या इसमासाठी धावून आला त्याने त्याच्या बुद्धीचांतुर्याच्या जोरावर त्या व्यक्तीला त्याचे नाव आणि पत्ता विचारला तेव्हा त्याचे नाव कारभारी निलेश लक्ष्मण आणि गाव पारंगखार, ता. रोहा, जी अलिबाग जवळ आहे एवढंच त्या व्यक्तीने मोडक्या तोडक्या शब्दात सांगितले ,ऋषिकेशने त्या व्यक्तीचा फोटो आणि माहिती खामुंडी गावचे सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके यांना दिली बोडके यांनी ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, उपनिरीक्षक अजित पाटील पोलीस हवालदार महेश पटारे यांना कळवली तसेच बोडके यांनी रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांचा मोबाईल नंबर शोधला आणि त्यांना देखील संपर्क केला, त्या व्यक्तीचा फोटो आणि माहिती रोहा पोलिसांना पाठवल्यामुळे त्या व्यक्तीचा शोध लावण्यात बोडके यांना यश आले असून तो चार महिन्यांपासून हरवला होता. रात्र जास्त झाल्यामुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती तात्काळ खामुंडी येथे पोहचणे शक्य नव्हते त्यामुळे बोडके यांनी त्याची रात्र भरासाठीची जबाबदारी लालू महाले व केशव क्षीरसागर यांच्या मदतीने पार पाडली. या सर्वांनी त्याचा रात्रभर व्यवस्थित सांभाळ केला असून त्या व्यक्तीची आई खामुंडी येथे आल्यानंतर , पोलीस कर्मचारी राजेंद्र कोंढार, पोलीस पाटील दत्ताराम कांबळी यांच्या समक्ष खात्री करून त्यास त्याचे आईचे ताब्यात देण्यात आले.
माणसातील माणुसकीचा आदर्श कसा असावा हे दाखवून देणाऱ्या कैलास बोडके व क्षीरसागर परिवाराचे परिसरात सर्वच स्थरातून कौतुक व्यक्त केले जात आहे.

Related posts

*ठाणे मनपा आयुक्त अभिजीत बांगर देतात का कचऱ्यातून विष ??..नागरिकांचा सवाल*

नगर-पुणे ‘वरील वाहतूक व्यवस्थेत बदल

आघाडी सरकार पाडण्याचे स्वप्न पाहणा-यांचा स्वप्नभंग निश्चित!!बाळासाहेब थोरात

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment