Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजशहर

*शाळेतील स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना – निकृष्ट कामाचा पर्दाफाश, जबाबदारांवर कारवाईची मागणी*

*शाळेतील स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना – निकृष्ट कामाचा पर्दाफाश, जबाबदारांवर कारवाईची मागणी*

नेरुळ, १९ जून : नेरुळ सेक्टर ३० मधील भूखंड क्रमांक ८अ वर अंदाजे ७.७५ कोटी रुपयांच्या खर्चाने उभारण्यात आलेल्या नव्या शाळेची इमारत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे चर्चेत आली आहे. शिक्षण वर्षाच्या केवळ चौथ्या दिवशीच इयत्ता ६ वी ‘क’ वर्गात शिकवणूक सुरू असताना स्लॅबचे प्लास्टर अचानक कोसळले. या दुर्घटनेत वर्ग शिक्षिकेला किरकोळ दुखापत झाली असून वर्गातील ३६ विद्यार्थी थोडक्यात बचावले.

ही घटना घडताना स्लॅबचे दोन मोठे तुकडे जमिनीवर कोसळले. याच मजल्यावरील मुख्य बीममध्येही मोठे तडे पडल्याचे आढळून आले असून, त्यामुळे पाणी गळती होऊन एका वर्गामध्ये पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले. टेरेसवर ठेवलेली एक प्लास्टिकची पाण्याची टाकी सुद्धा तुटून खाली पडली आहे. सीमेंटच्या टाकीऐवजी प्लास्टिकची टाकी वापरणे हे सुरक्षा दृष्टीने गंभीर दुर्लक्ष मानले जात आहे.

याशिवाय शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे शासनाचे निर्देश असूनही, अद्याप हे कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. विद्यार्थ्यांच्या शौचालयाबाहेर सूचना फलक नसणे, भिंतींवर पडलेले तडे, आणि गळतीमुळे ओलसर झालेली कक्ष यामुळे संपूर्ण इमारतीच्या बांधकामात घोर निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट होत आहे.

या घटनेमुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या पार्श्वभूमीवर, *ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख समीर बागवान* यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासनिक कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासोबतच संपूर्ण इमारतीची तांत्रिक तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती तातडीने करण्याचे आवाहन त्यांनी केले. शाळेमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा तत्काळ बसवावी आणि विद्यार्थ्यांच्या शौचालयांबाहेर सूचना फलक लावण्याचे आदेश प्रशासनाने त्वरित द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

“या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही हे नशिब, पण भविष्यात यासारखी दुर्घटना घडल्यास जबाबदार ठेकेदार आणि अधिकारी यांना थेट उत्तरदायी धरले जाईल,” असा स्पष्ट इशाराही बागवान यांनी दिला.

या वेळी उपजिल्हाप्रमुख सुमीत्र कडू, विभागप्रमुख मिलिंद भोईर, विशाल विचारे, युवा सेना शाखा अधिकारी अक्षय गमरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts

हजार, लाख की कोटी… तुम्ही घरात किती कॅश ठेवू शकता?

jantechasavdhanmaharashtra

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांच्या उत्तम कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

jantechasavdhanmaharashtra

तुर्भे पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशा

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment