Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजशहर

*साईश्वर सामाजिक सेवा संस्थेचा ९ वा मोफत शिर्डी दर्शन भव्य सोहळा यशस्वी*

*साईश्वर सामाजिक सेवा संस्थेचा ९ वा मोफत शिर्डी दर्शन सोहळा  यशस्वी*


प्रतिनिधी :-जनतेचा सावधान महाराष्ट्र

घणसोली – श्रद्धा, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवणारा साईश्वर सामाजिक सेवा संस्था, घणसोली यांचा मोफत शिर्डी दर्शन सोहळा २०२६ हे ९ वे वर्ष अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध नियोजनातून पार पडले. तब्बल एक हजारहून अधिक महिला, पुरुष, युवक व बालकांनी या उपक्रमाचा लाभ घेत साईबाबांच्या चरणी माथा टेकला.

समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना आर्थिक अडचणींमुळे दर्शनापासून वंचित राहावे लागू नये, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. प्रवास, दर्शन व्यवस्था, भोजन आदी सर्व सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देत संस्थेने सेवाभावाचे उत्तम उदाहरण घालून दिले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांची सुरक्षित व सोयीस्कर यात्रा होण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले होते.

संस्थेचे संस्थापक श्री राजू थोरात व सौ. सुरेखा राजू थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपक्रमाचे अध्यक्ष रुपेश पाटील आणि सर्व कार्यकर्ते, महिला भगिनी यांच्या अथक परिश्रमातून हा सोहळा यशस्वी झाला. श्री राजू थोरात यांनी गेल्या नऊ वर्षांत सातत्याने सामाजिक कार्याची परंपरा जपत साईभक्तांसाठी हा उपक्रम अखंड सुरू ठेवला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे घणसोली परिसरात सेवाभावाची मजबूत पायाभरणी झाली असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

या उपक्रमास आदरणीय गणेशजी नाईक साहेब, संजीवजी नाईक साहेब, संदीपजी नाईक साहेब तसेच सागरजी नाईक साहेब यांनी शुभेच्छा देत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. समाजहिताच्या अशा उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य आणि आध्यात्मिक जागर निर्माण होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

साईश्वर सामाजिक सेवा संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमामुळे घणसोली परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात सामाजिक, धार्मिक व जनहिताचे उपक्रम राबविण्याचा संकल्प संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

Related posts

वाशी प्लाझा सेक्टर 17 मधील हॉटेल गोल्डन सूट्स तसेच तेरझा लंग वर वाशी पालिकेची धडाकेबाज कारवाई

नैना विरोधातील जनआक्रोश रॅलीला सुरुवात; पनवेलसह उरण, पेण तालुक्यातील 207 गावांना देणार भेटी

jantechasavdhanmaharashtra

अवैध / अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाईचे आयुक्तांचे आदेश

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment