Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

कर्णकर्कश्श आवाज़ करणाऱ्या दुचाकी वाहनांवर ‘ कोपरखैरणे वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई

*कर्णकर्कश्श आवाज़ करणाऱ्या दुचाकी वाहनांवर ‘ कोपरखैरणे वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई*

कोपरखैरणे, (प्रतिनिधी:-.अशोक काळे) दुचाकी वाहनांच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून कर्णकर्कश्श आवाज करीत वाहने चालविणाऱ्या चालकांवर कोपरखैरणे वाहतूक शाखेने कारवाई केली आहे. कोपरखैरणे वाहतूक पोलिसांनी शनिवार (दि. २१) रोजी कोपरखैरणे रोडवरती नाकाबंदी करून अनेक आशा स्पोर्टस बाईक आणि बुलेट कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे.
अनेक नागरिकांनी या संदर्भात तक्रारी केल्या होत्या

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या सूचनेनुसार वाहने भरधाव चालविणाऱ्यांसह कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईमध्ये बुलेट, स्पोर्टस् बाईक आहेत.
कोपरखैरणे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी अनेक बाईक चालवणाऱ्या तरुणांना
वेळोवेळी सूचना केल्या अनेक वेळा वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात जनजागृतीचे आवाहन केले होते. पण तरीही अनेक बेजबाबदार तरुण वर्ग आजही वाहने जोरात चालवून इतरांना त्रास देत असल्याचे आढळून येत आहे, त्यामुळे कोपरखैरणे वहातुक पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांच्या नेतृत्वाखाली आज कोपरखैरणे येथे मोठ्या प्रमाणात दुचाकी वरती कारवाई करण्यात आली व अल्टरेशन सायलेन्सर जमा करण्यात आले कोपरखैरणे वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी बायकर्सला सूचना दिल्या की, पुन्हा असे बदल केलेले सायलेन्सर आढळल्यास गाडी जमा करण्यात येईल,
अनेक वयोवृद्ध नागरिकांनी सायलेन्सर च्या आवाजाला कंटाळल्यामुळे झालेल्या कारवाई चा आनंद व्यक्त करत कोपरखैरणे वाहतूक पोलिसांचे कौतुक केले.

Related posts

नवी मुंबई महानगरपालिकेचे हे मोबाईल टॉयलेट आहे की होर्डिंगबाजी…

विनापरवानगी उभारण्यात आलेल्या होर्डिंगवर वाशी विभागाची कारवाई ! वाशी विभाग अधिकारी सागर मोरे

jantechasavdhanmaharashtra

अफगाणिस्तान: महासत्तांचा बळी (भय इथले संपत नाही…)

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment