Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

अखेर नवी मुंबई मेट्रोला मुहूर्त मिळाला!

*अखेर नवी मुंबई मेट्रोला मुहूर्त मिळाला, पंतप्रधान मोदींच्या हस्ते या दिवशी लोकार्पण*

नवी मुंबई (प्रतिनिधी)
नवी मुंबईतल्या बहुप्रतिक्षित मेट्रोला अखेर मुहूर्त मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतल्या मेट्रोचं लोकार्पण होणार आहे.
30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत, तेव्हाच मेट्रोचं लोकार्पण करण्यात येईल. याबाबत मेट्रो व्यवस्थापनाकडून सिडकोला पत्र देण्यात आलं आहे. मेट्रोची सगळी कामं झाली असून पंतप्रधान येत असल्याचं या पत्रात मेट्रो व्यवस्थापनाने अवगत केलं आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईतील नागरिकांना मेट्रोच्या उद्घटानाची प्रतीक्षा होती.
नवी मुंबई मेट्रो लाईन 1 ही 11.1 किमीची असून यामुळे बेलापूर ते पेंढार मेट्रो लाईनने जोडले जाणार आहेत. या मेट्रो लाईनवर एकूण 11 स्टेशन्स असणार आहेत.
मेट्रो स्टेशन्स
बेलापूर, सेक्टर-7 बेलापूर, सायन्स पार्क, उत्सव चौक, सेक्टर 11 खारघर, सेक्टर 14 खारघर, सेन्ट्रल पार्क, पेठा पाडा, सेक्टर 4 खारघर, पंचनंद, पेंढार टर्मिनल
नवी मुंबई मेट्रोचा मेन्टन्स डेपो तळोजाला तर दोन ट्रॅक्शन सबस्टेशन पंचनंद आणि खारघरला असणार आहेत. अनेक अडीअडचणींचा सामना करायला लागल्यामुळे नवी मुंबई मेट्रोची ही लाईन सुरू व्हायला 12 वर्ष लागली. नवी मुंबईची ही मेट्रो लाईन मुंबईतली पहिली होती, पण मुंबई मेट्रो लाईनचं जून 2014 साली लोकार्पण झालं.
मुंबईतल्या 35 किमीच्या दोन मेट्रो लाईन 2 A आणि 7 दहिसर ते अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आणि लिंक रोड या मेट्रोचं 2023 सालीच लोकार्पण झालं. तर मेट्रो लाईन 6, 4 आणि अंडरग्राऊंड मेट्रो लाईन 3 यांचं लोकार्पणही यावर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी सुरूवातीला होणार आहे.
नवी मुंबई मेट्रोच्या तिकीटाचे दर 10 रुपये ते 40 रुपये असतील. 2 किमीपर्यंतच्या प्रवासासाठी 10 रुपये आणि 10 किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी 40 रुपये मोजावे लागणार आहेत.

Related posts

17 प्लाझा च्या बाजूला एपीएमसी विभागामध्ये हॉटेल कुबेर च्या बाजूला ट्रिपल पार्किंगमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात समस्या

*नक्षलग्रस्त भागातील विशेष कामगिरीबद्दल नवी मुंबई पोलिसांच्या ५ अधिकाऱ्यांना ‘विशेष सेवा पदक’*

jantechasavdhanmaharashtra

कोपरखैरणे वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई ! वाहतुकीचे नियम मोडनारांवर होणार कडक कारवाई!*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment