Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

कोपरखैरणे वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई ! वाहतुकीचे नियम मोडनारांवर होणार कडक कारवाई!*

*कोपरखैरणे वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई ! वाहतुकीचे नियम मोडनारांवर होणार कडक कारवाई!*

कोपरखैरणे (प्रतिनिधी)

कोपरखैरणे विभागामध्ये बेकायदेशीर बांधकामामुळे पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण कोपरखैरण्यात विभागात, पार्किंगच्या प्रश्नामुळे अनेक महत्त्वाच्या रोडवरती ही, वाहतुकीचा प्रश्न उद्भवला आहे. या अनुषंगाने कोपरखैरणे विभागाचे कर्तव्य दक्ष अधिकारी वाहतूक सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांची काही दिवसांपूर्वीच कोपरखैरणे वाहतूक शाखे मध्ये नियुक्ती झाली. आणि या वाहतुकीच्या प्रश्नावरती त्यांनी गांभीर्याने लक्ष घालत गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. व सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने वाहतूकदारांना मार्गदर्शनही केले आहे.आज दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजल्या पासून, कोपरखैरणे येथिल अनेक वर्दळीच्या ठिकाणी स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी आपल्या कर्मचाऱ्या सह कारवाईला सुरवात केली. कोपरखैरणे स्टेशन ,पॉकेट से 10 , सेक्टर 14 15 16 तसेच अनेक कोपरखैरणे विभागातील शाळा व घनसोली स्टेशन, अशा अनेक वर्दळीच्या विभागांमध्ये विशेष मोहीम राबवून, नियम मोडणाऱ्या एकूण 260 वाहनांवरती सहाय्यक पोलिस निरीक्षक भिंगारदिवे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. कोपरखैरणे रेल्वे स्टेशनच्या बाजूला सबवे येथे अनेक मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होत होती, येथेही मोठ्या प्रमाणात कारवाई करून बऱ्यापैकी वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागला सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांच्या नियुक्तीनंतर एकूण 1528 वाहनांवरती कारवाई करण्यात आली. आजच्या कारवाईनंतर कोपरखैरणे विभागातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागला असे स्थानिक नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले व कोपरखैरणे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांचे व त्यांच्या समवेत त्यांच्या कर्मचाऱ्यांचे नागरिकांनी वाहतूक शाखेच्या कार्यालयात येऊन केले कौतुक व मानले आभार..!

कोपरखैरणे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विस्वास भिंगारदिवे यांनी सांगितले की जो पर्यंत वाहतूकदार नियम पाळत नाही तो पर्यंत अशीच कडक कारवाई या पुढेही चालू राहणार

Related posts

जबरी लॅपटॉप बॅग.. चोरीचा आरोपी रंगेहात पकडले

jantechasavdhanmaharashtra

वाहुतकीचे उल्लंघन काही दुचाकी चालक करत असल्याने नागरीकांना नाहक त्रास होत आहे!

32 वर्षानंतर भाजपचा किल्ला ढासळला; कसब्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment