Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूज

*१५ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या दोघांना दीड तासात कोपरखैरणे पोलीसांनी केली अटक; पीडित मुलाची सुखरूप सुटका*

*१५ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या दोघांना दीड तासात अटक; पीडित मुलाची सुखरूप सुटका*

*नवी मुंबई, कोपरखैरणे : घनसोली येथील एका १५ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडे १२ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघा आरोपींना केवळ दीड तासाच्या आत पोलिसांनी अटक करत पीडित मुलाची सुखरूप सुटका केली.

फिर्यादी श्री. संजय नारायण भोसले (वय ५१, रा. सेक्टर ३, घनसोली) यांनी सायंकाळी ९.३० वाजता कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांचा १५ वर्षीय मुलगा याचे जुन्या पैशांच्या व्यवहारावरून अपहरण करण्यात आले असून, त्याच्या सुटकेसाठी १२ लाख रुपयांची खंडणी मागितली जात आहे.

ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तीन पथकांची स्थापना करण्यात आली.

* गुंडा विरोधी पथकाचे API नितीन कुंभार व त्यांचे सहकारी
* स्थानिक गुन्हे शाखेचे API राजेश महाला व त्यांचे पथक
* पोलीस ठाण्याचे SHO API सुनील बोड़के व बीट मार्शल

संशयितांची माहिती गोळा करून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. तसेच खंडणी रक्कम देण्याच्या निमित्ताने एक सापळा रचण्यात आला. या कारवाईत संशयित आरोपी राज भालेराव (वय ३२) व यश गरुड (वय २६, दोघेही रा. नाशिक) यांना रबाळे परिसरातून अटक करण्यात आली.

सदर आरोपींनी पीडित मुलाचे कायदेशीर संरक्षकत्व वापरून त्याचे अपहरण केले होते. रात्री ११ वाजता पीडित मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली.

या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात CR No. 468/25 नुसार BNS कलम 140(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

**ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.**

**तपास पथक:**

* API नितीन कुंभार व गुंडा विरोधी पथक
* API राजेश महाला व डीबी पथक
* API सुनील बोड़के व बीट मार्शल
कोपरखैरणे पोलीस ठाणे, नवी मुंबई

Related posts

घणसोली विभागात विविध ठिकाणी अतिक्रमणाचा सुळसुळाट कुंपणच शेत खात असेल!.. तर कारवाई कोण करणार? संतप्त नागरिकांचा सवाल!.

किड्स स्माईल प्री स्कूल तर्फे वार्षिक क्रीडा संमेलन उत्साहात साजरे

सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाचे फायनान्शियल क्लोजर पूर्ण*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment