Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

कोपरखैरणे ,घणसोली येथील बस स्टॉप वरील अनाधिकृत वाहन पार्किंग वरती आता होणार कडक कारवाई

नविमुंबई कोपरखैरणे: (प्रतिनिधी)

नवी मुंबई येथील कोपरखैरणे घनसोली विभागामध्ये बस थांबा वरती अनेक वाहने अनाधिकृत पार्किंग केलेली अनेक वेळा आढळण्यात आली, त्यामुळे एन एम एम टी व बेस्ट बस साठी नागरिकांना चढण्या उतरण्यासाठी अनेक वेळा अडचण होत होती.व बस रस्त्याच्या मध्यभागी थांबवावी लागत असे, त्यामुळे संपूर्ण रस्ता जाम झाल्यामुळे वाहतूक कोंडी होत असे, तरीही वाहनधारक बस थांबाच्या आजूबाजूलाच वाहने पार्किंग करत होते त्यांना कित्येक वेळा समज देऊनही वारंवार वाहने बस थांबाच्या आजूबाजूलाच पार्क करत होते या अनुषंगाने नवी मुंबईतील नागरिकांना होणारा त्रास व जनहितासाठी घेन्यात आलेला निर्णय नवी मुंबई पोलिस आयुक्त  मिलिंद भारंबे यांच्या आदेशाने नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व कोपरखैरणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांच्या नेतृत्वाखाली कोपरखैरणे वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी यांनी घनसोली व कोपरखैरणे विभागातील बस थांबा वरती व आजूबाजूला असलेले अनाधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली व घणसोली कोपरखैरणे विभागातील बस थांबा हा मोकळा करण्यात आला
त्यामुळे येणार जाणाऱ्या बस चालक व नागरिक यांनी कोपरखैरणे वाहतूक शाखेचे प्रमुख विश्वास भिंगारदिवे यांचे आभार व्यक्त केले. व सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी कोपरखैरणे व घनसोली वाहनधारकांना आव्हान केले की, वाहतुकीस अडचण होणार नाही, व अनधिकृत पार्किंग करून जनतेला त्रास होणार नाही, अशा ठिकाणी आपण वाहने पार्किंग करावी अन्यथा येथून पुढे ही अशा ठिकाणी वाहणे आढळून आल्यास वाहनांवरती यापेक्षाही कडक कारवाई करण्यात येईल असे आव्हान नागरिकांना करण्यात आले.

Related posts

नवी मुंबई महानगरपालिकेचे काही माजी प्रतिनिधींची चालते मनमानी

jantechasavdhanmaharashtra

*साईश्वर सामाजिक सेवा संस्थेचा ९ वा मोफत शिर्डी दर्शन भव्य सोहळा यशस्वी*

आळेफाटा पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment