Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

एकच शिवसेना खरी, बाकी धोत्र्याच्या कडू बिया’, संजय राऊत

*’एकच शिवसेना खरी, बाकी धोत्र्याच्या कडू बिया’, संजय राऊत पुन्हा कडाडले…*

सावधान महाराष्ट्र(प्रतिनिधी)  कथित पत्राचाळ घोटाळा
प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 100 दिवसानंतर राऊत तुरुंगातून बाहेर आले. राऊतांना जामीन मिळाल्याने ठाकरे गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. तुरुंगाबाहेर आल्यानंतर राऊत आपल्या जुन्या स्टाईलमध्ये परतले आहेत.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत हे भव्य रॅलीत सामील होऊन घराकडे निघाले आहेत. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, ‘मी गेल्या 100 दिवसांपासून तुरुंगात होतो. बाहेर काय सुरू होतं, ते आत राहून कळतं नव्हतं. बाहेर येऊन समजतंय की, आता उद्धव ठाकरेंची शिवसेना झाली आहे. पण, आमचा कणा मोडलेला नाही. आम्ही शिवसैनिक आहोतत, लढत राहू.’

ते पुढे म्हणतात की, ‘आमचं आयुष्य बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत गेलं. एकच शिवसेना खरी आहे, ती म्हणजे बाळासाहेबांनी निर्माण केलेली आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली. बाकी सगळ्या धोत्र्याच्या कडू बिया आहेत. हा महाराष्ट्र मुंबई कोणाच्या मागे आहे, ते त्यांना हळुहळू कळेणच.’

*आता तर मशाल आहे…*

‘त्यांचं हे तात्पुरतं राजकारण सुरू आहे. आता बाहेर आलोय. हळहळू कामाला लागू. गेल्या 30-35 वर्षापासून मुंबई महापालिकेवर बाळासाहेबांचा भगवा फडकत आहेत, तो तसाच फडकत राहणार. त्या भगव्याला कोणी हात लावाल, तर जळून खाक व्हाल. असे तेज त्या भगव्यात बाळासाहेबांनी निर्माण केलं आहे. आता तर मशाल आहे…’ अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

Related posts

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दिल्ली येथे तिरंगा वाटप*

मा.आमदार नरेंद्र पाटील यांनी आपले जीवन प्रवास माथाडीसाठी वाहून घेतले! माथाडी कामगार

*सिडकोची घरे १० टक्क्यांनी स्वस्त; १९ हजार घरांची महागृहनिर्माण योजना जाहीर*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment