Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजशहर

गहाळ झालेला मोबाईल 24 तासाच्या आत शोधून देण्यास कोपरखैरणे पोलिसांना यश

गहाळ झालेला मोबाईल 24 तासाच्या आत शोधून देण्यास कोपरखैरणे पोलिसांना यश

 

नवी मुंबई (प्रतिनिधी)
कोपरखैरणे विभागात चोरी गेलेले व गहाळ झालेले अनेक मोबाईल कोपरखैरणे पोलिसांना शोधून देण्यास मोठ्या प्रमाणात यश आले आहे त्यातच
दि.16/02/2025 रोजी कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीत गुलाब डेअरी येथे बसमधून प्रवास करीत असताना श्री विश्वंभर पांडुरंग मोरे यांचा रेडमी कंपनीचा मोबाईल गहाळ झाल्याबाबत त्यांनी कोपरखैरणे पोलीस ठाणे येथे तक्रार दिली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने पोशि/12094 राहुल मोरे यांनी सदरची माहिती CEIR Portal वर तात्काळ भरून घेतली व दिनांक 17/02/2025 रोजी सदर मोबाईल चा वापर गोवंडी येथे होत असलयाचे समजले कोपरखैरणे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना ही माहिती दिल्यानंतर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानंतर पोशि/12094 राहुल मोरे यांनी इसमाशी संपर्क साधून त्यांना तो मोबाईल पोलीस ठाणे येथे जमा करणे बाबत कायद्याने आणि पोलीसी भाषेत सांगितले असता त्यांनी सदरचा मोबाईल कोपरखैरणे पोलीस ठाणे येथे जमा केला व सदरचा मोबाईल तात्काळ तक्रारदार यांना पोलीस ठाणे येथे बोलावून केवळ 24 तासाच्या आतच सन्मानपूर्वक कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या हस्ते परत करण्यात आला तक्रारदार व कोपरखैरणे विभागातील नागरिकांनी कोपरखैरणे पोलिसांचे कौतुक करत आभार व्यक्त केले

Related posts

बेरोजगार तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा,

पनवेल वाहतूक पोलिसांकडून विशेष जनजागृती मोहीम

jantechasavdhanmaharashtra

25 जानेवारी रोजी मराठा समाजाचा मोर्च्या APMC हद्दीत मुक्कामी असल्या मुळे वाहतुकीत बद्दल

Leave a Comment