Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हाब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

पत्रकारांना केव्हाही कधीही अडचण भासल्यास फक्त आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू – यशवंत सोरे

पत्रकारांना केव्हाही कधीही अडचण भासल्यास फक्त आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू – यशवंत सोरे
9आम्ही सेवक आहोत मात्र आपल्यासारख्या देवदूतांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली आहे – मनिलाल शिंपी
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग व आर .एस. पी .अधिकारी युनिट ठाणे यांच्या सौजन्याने सफाई कर्मचारी व पत्रकारांना रेशन कीट वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न.
भिवंडी दि.४(स्व.रा.तो)महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग आयोजित आर .एस. पी .अधिकारी युनिट ठाणे यांच्या सौजन्याने ग्रामपंचायत वळ येथील
सफाई कर्मचारी व भिवंडी शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांना रेशन कीट वाटप कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि.४/०८/२०२१ रोजी दैनिक स्वराज्य तोरण कार्यालय कैलास नगर वळपाडा भिवंडी येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.वसंत मुंढे,कार्याध्यक्ष श्री,संजयजी भोकरे,राज्य सरचिटणीस श्री विश्वासराव आरोटे, प्रसिध्दी प्रमुख श्री.नवनाथ जाधव, कोकण विभाग अध्यक्ष श्री नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.याच कार्यक्रमाचे औचित्य साधुन सामाजिक, शैक्षणिक ,क्रीडा, सांस्कृतिक,आरोग्य,व वारकरी संप्रदायात नेहमीच सामाजिक बांधीलकी जपून मदतीचा हात देण्यासाठी सदैव पुढाकार घेऊन सहकार्य करणारे व्यक्तिमत्व धर्म सेवक श्री.सोन्या काशिनाथ पाटील, भाजपा ठाणे जिल्हा व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री.यशवंत महादू सोरे, भोकरी गावचे समाजसेवक श्री.रामचंद्र शांताराम देसले, भाजपा ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष तथा माजी सरपंच श्री.श्रीधर जयवंत पाटील, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभागीय सरचिटणीस श्री.किशोर बळीराम पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आर. एस. पी .कमांडर श्री.मनिलाल शिंपी यांनी पीस ब्रँड अँबेसिडर अँड डायरेक्टर, महाराष्ट्र राज्य महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन, इन्स्टिट्यूट, आयएसओ प्रमाणित, ओडीसा स्टेट गव्हर्मेंट संलग्न आयोग पुरस्कृत,(The Globle Best Social Worker award 2021, आणि Bharat Seva Ratna Gold Medal award 2021) ग्लोबल पीस भारत सेवा रत्न सुवर्ण पदक पुरस्कार देऊन वरील मान्यवरांचा सन्मान आर एस पी कमांडर श्री मणिलाल शिंपी व संपादक श्री. किशोर बळीराम पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.तसेच महिला पत्रकार यांचा देखील हिरकणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. व पत्रकार बांधवांना देवदूत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी धर्मसेवक श्री.सोन्या काशिनाथ पाटील, भाजपा ठाणे जिल्हा व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री.यशवंत महादू सोरे, भोकरी गावचे समाजसेवक श्री.रामचंद्र शांताराम देसले, भाजपा ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष तथा माजी सरपंच श्री.श्रीधर जयवंत पाटील मुख्य आयोजक श्री किशोर बळीराम पाटील संपादक दैनिक स्वराज्य तोरण व आर .एस. पी. कमांडर श्री. मनीलाल शिंपी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पालघर जिल्हा अध्यक्ष श्री .विकास पाटील, प्रा.विनोद पाटील, सचिव श्री.सुशांत संखे,पोलीस पाटील डॉ.सुनंदा पाटील,पोलीस पाटील संघटनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष श्री.सोमनाथ ठाकरे,माजी सरपंच श्री संजय पाटील, सह्याद्री पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुभाष पाटील, सह सरव्यवस्थापक ऑड.श्री संजय पाटील,उद्योजक श्री.अरुण पाटील,ज्येष्ट पत्रकार श्री.दौलत घरत,श्रीमती कुसुम ताई देशमुख,राजेंद्र काबाडी,राजेंद्र पाटील, सुरजपाल यादव,ग्रामपंचायत सदस्या सौ.वनिता अनिल पाटील, स्वामी नारायण ट्रस्ट चे संचालक श्री.दिनेश भाई ठक्कर,रोटी डे ग्रुपचे सचिव श्री.तरुण नागडा, श्री. केशव मालुंजकर उपसमादेशक मुलुंड,आर एस पी युनिट अधिकारी श्री. महादेव शिरसागर ,जितेंद्र सोनवणे, बापू शिंपी ,भगवान परदेशी, जयवंत राऊत, पत्रकार सुधा चक्रवर्ती, नितीन पंडित,महेंद्र कुमार सरोज, श्रीनिवास सिरीमल्ले, मेहंदी हसन, ताज अंसारी ,लवलेश सुतार, वेंकटेश रापेल्ली, रेहान खान ,सी.पी.तिवारी,निलम तिवारी,परवीन खान, रेश्मा अंसारी, आदी मान्यवर व ग्रामपंचायत सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात विशेष सत्कार मूर्ती म्हणून सह्याद्री पतसंस्थेच्या शिवाजीनगर शाखाधिकारी तथा दैनिक स्वराज्य तोरणच्या कार्यकारी संपादीका सौ संगीता किशोर पाटील यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
सर्वप्रथम मी आयोजक संपादक श्री.किशोर पाटील व कमांडर श्री.मनिला शिंपी यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी समाजासाठी जाणीव ठेवून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली आहे. पत्रकारांना देवदूत पुरस्कार दिल्यामुळे त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेतली जाते अशी भावना निर्माण झाली आहे. पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो, पत्रकारिते सारखं कठीण काम कोणतच नाही कारण कोणत्याही वेळी कोणत्याही परिस्थितीत उन्हाळा, पावसाला किंवा हिवाळा असो घटना घडलेल्या ठिकाणी त्यांना पोहोचावेच लागते व सदर घटनेचे सविस्तर वृत्तांकन करून आपल्याला ताज्या घडामोडी बातम्या त्यांच्यामार्फत वाचायला मिळतात. त्यामुळे त्यांना देवदूत म्हणून पुरस्कार दिला गेला तो खरोखरच वाख्याणा जोगे आहे. तसेच आमच्या सारखे काही समाजसेवक असतील त्यांना आपल्याकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यामुळे जे काम आम्ही करत आहोत त्यापेक्षा शंभर पटीने आम्ही जास्त काम करण्यासाठी प्रयत्न करू तसेच पत्रकारांना केव्हाही काहीही अडचण भासल्यास आम्हाला फक्त आवाज द्या आम्ही तुमच्या सदैव पाठीशी उभे राहू असे अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना यशवंत महादू सोरे यांनी सांगितले. आमचे आर एस पी युनिट ठाणे १८ जिल्ह्यांमध्ये काम करीत आहे.व नुकताच मला संपूर्ण कोकण विभागाची जबाबदारी दिली आहे.आम्ही कराडला गेलो होतो तेथे मदती साठी खोटी टोळी सक्रिय झाली आहे हे आम्हाला लक्षात आल्या मुळे योग्य ठिकाणी मदत दिली गेली पाहिजे
हि संपूर्ण माहिती घेवून आम्ही योग्य पूरग्रस्तांना मदत दिली. जमलेले सर्व पदाधिकारी मान्यवर व्यक्ती व पत्रकार बंधुंनो मी खूप महान नाही मी माझे कर्तव्य करतो आमचे जीवन सेवेसाठी या तत्त्वावर आमचे आर एस पी अधिकारी संपूर्ण युनिट काम करीत आहे आम्हाला जी साथ लाभली ती स्वामीनारायण ट्रस्टचे संचालक श्री दिनेश भाई ठक्कर आणि रोटी डे ग्रुपचे सचिव श्री तरुण नागडा व इतर संस्था अशा या खऱ्या अर्थाने देवदूत माणसांच्या सहकार्याने आम्ही हे कार्य करू शकतो आम्ही सेवक आहोत आम्हाला सेवा करण्याची संधी आपल्यासारख्या देवदूतांनी दिली आहे
असे आर एस पी कमांडर श्री मणिलाल शिंपी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. त्याच बरोबर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष श्री .श्रीधर पाटील व प्राध्यापक विनोद पाटील यांनी ही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्य आयोजक श्री.किशोर बळीराम पाटील यांनी केले.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभागाचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच आर एस पी युनिट ठाणे यांचे अधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.

Related posts

वडज गावामध्ये नवजवान गणेशोस्तव मंडळाची शिवजयंती उत्साहात साजरी

jantechasavdhanmaharashtra

जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना अखेर बेड्या*

साताऱ्याचा उमेदवार ठरला; राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांची यादी

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment