Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमदेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*नवी मुंबईत बोगस पत्रकारांचा सुळसुळाट ! पोलीस आयुक्तालया मार्फत बोगस पत्रकारांवर करावी कारवाई*

*नवी मुंबईत बोगस पत्रकारांचा सुळसुळाट ! पोलीस आयुक्तालया मार्फत बोगस  पत्रकारांवर करावी कारवाई*

नवी मुंबईत बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे. व्यावसायिक, हॉटेल मालक, बार मालक, आणि पोलिसांना ह्या बोगस पत्रकारांकडून नाहक त्रास दिला जात आहे. एवढेच नाही तर वडापाव वाले व रस्त्यावर बसणारे फेरीवाले यांच्याकडून हे बोगस पत्रकार हप्ते घेत असल्याचे बोलले जात आहे. काहीजण YOUTUBE च्या नावाखाली आपण पत्रकार आहोत. आपली बातमी लावली जाईल. आम्हाला एवढे द्या तेवढे द्या. असे म्हणणाऱ्या बोगस पत्रकारांवर नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कठोर भूमिका घ्यावी असे वरिष्ठ पत्रकारांकडून सांगितले जात आहे. पत्रकार कोण ? याबाबत काही निकष लावले जावेत जेणेकरून चांगल्या पत्रकारांची चांगली प्रतिमा जोपासली जाईल.

काही दिवसापूर्वी अशाच बोगस पत्रकारांकडून बार मालकांना लक्ष केले गेले. त्यातून बार मालकाने त्या बोगस पत्रकाराला चांगला चोप दिला असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत नेरुळ पोलीस ठाणे तसेच एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी नेरुळ पोलीस ठाण्याअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्हा नोंद (११८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (२), ३०८ (३), ३५१ (२)) मध्ये फिर्यादी

स्टार गोल्ड बारचे चालक रविंद्र रघुराम शेट्टी यांनी सांगितले कि, “नामे देवेश मिश्रा या इसमाने पत्रकार आहे असे सांगून, मी तुमचे बारबाबत द्विटरवर द्विट करून तसेच न्यूज चॅनलवरती वारंवार टाकुन मी तुमचा बार बंद करून टाकेल. तुमचा बार चालु रहावा असे वाटत असेल तर तुम्हाला मला दर महिना ४ हजार रूपये दयावे लागतील. त्याचप्रमाणे शिरवणे गाव परिसरातील इतर बार व हॉटेल मध्ये जावून देखील खंडणीची मागणी केली. दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी रात्री १०:०० वाजता सुमारास साई दर्शन हॉटेल येथे मी व इतर बारचालकांचे मिटींग मध्ये देखील त्यांने आम्हाला “आपका कितना होटल है, हर एक हॉटेल का आपको दो-दो हजार देना पड़ेगा 1 हर महिना 1 नहीं तो मैं आप सबका हॉटेल बंद करेंगा। और आप सबके हॉटेल का फोटोज द्विटर पे पोस्ट करेंगा और न्युज मैं भी देगा 1 सोचो क्या करने का है।” असे म्हणून प्रत्येकी २ हजार रूपयांची खंडणी मागीतली तसेच त्याने व्हॉटस अपवर देखील मेसेज, फोटोज

व ऑडीओ क्लिप पाठवून धमकी दिली”.

त्याचप्रमाणे दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी एपीएमसी पोलीस ठाण्याअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्हा नोंद (१०५/२०२५ कलम ३०८ (२) (३),३५२, ३५१ (२) बी. एन. एस.) मध्ये फिर्यादी शरद भास्कर कुमार शेट्टी (हॉटेल चालक, बाबा पॅलेस बार अँड रेस्टारंट) यांनी सांगितले कि, “दिनांक ६ फेब्रुवारी २५ रोजी रात्रौ ११:१० वा. दरम्यान बाबा पॅलेश, अशोका बिल्डींग, सेक्टर १८, मॅफको मार्केट येथे हजर असताना आरोपीत (देवेश मिश्रा) इसम हा त्यांचे हॉटेलवर आला व त्याने, “मी तुमचे हॉटेल बंद करून टाकेन, मी सारखे न्युजला देईल, व्टिट करेन, माझी ओळख आहे तेथून तुम्हांला त्रास होईल. हॉटेल चालू ठेवायचे असेल तर मला प्रत्येक महिन्याला ४ हजार रूपये दयावे लागतील” असे बोलून शिवीगाळी करून ४ हजार रूपये खंडणीची मागणी केली. तसेच माहे नोव्हेंबर २०२४ च्या पहिल्या आठवडयामध्ये सुद्धा आरोपीत याने हॉटेलवर येउन तुमचे हॉटेलचे व्हिडिओ माझेकडे आहेत ते मौ व्हायरल करून तुमचे हॉटेल बंद करून टाकेल नाहीतर मला ३० हजार रूपये दयावे लागतील असे बोलून माझ्याकडून ३० हजार रूपये घेतले होते. “तरी याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तलया मार्फत बोगस पत्रकारांवर योग्य ती कारवाई करावी असे दबक्या आवाजात का होईना चांगल्या पत्रकारांकडून बोलले जात आहे.

Related posts

आमदार गणेश नाईक यांच्या आमदार निधीमधून आणि गणेश नाईक चारिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत ९ रुग्णवाहिकांचा लोकार्पण समारंभ विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.

jantechasavdhanmaharashtra

अखेर दिघा रेल्वे स्टेशनला अधिकृत नाव मिळाले

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांचा मनोज जरांगे पाटील यांना टोला.!

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment