Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयशहर

खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नातून ठाणे रेल्वे स्थानकातील कोपरी पूर्वेस दोन नवीन सरकते जिने यांचा लोकार्पण सोहळा संपन्न

 

ठाणे (प्रतिनिधी)-  ठाणे रेल्वे स्थानकाच्या कोपरी दिशेस दोन नवीन सरकते जिने आज पासून सुरू करण्यात आले आहेत. याचे उद्घाटन खासदार राजन विचारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेशजी मस्के यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला. या कार्यक्रम सोहळ्यात उपमहापौर पल्लवी कदम, ठाणे महानगरपालिकेचे उपनगर अभियंता पापळकर, ठाणे रेल्वे स्टेशन डायरेक्टर दीपासु सिंग, चीफ कमर्शियल इंस्पेक्टर मिश्रा, मध्य रेल्वेच्या विद्युत विभागाचे अभियंता सिंग, विभाग प्रमुख गिरीश राजे, नगरसेविका मालती रमाकांत पाटील, नम्रता हेमंत पमनानी, माजी नगरसेवक पवन कदम, उपविभाग प्रमुख अजू देहेरकर, शाखाप्रमुख राजु शेलार, राजू धमाले, महिला संघटक यमुना म्हात्रे, परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक, शिवसैनिक रमाकांत पाटील, रोहित गायकवाड, ठाणे शहर युवासेना अधिकारी नितीन लांडगे व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाणे रेल्वे स्थानकात नागरिकांच्या सोयीसाठी आत्तापर्यंत 8 सरकते जिने सुरू करण्यात आलेले आहेत व 4 लिफ्ट बसविण्यात आलेल्या आहेत. कल्याण व मुंबई दिशेस दोन नवीन पादचारी पुलाचे काम सुरू असून या पुलाच्या कामाला गती मिळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
आज सुरू करण्यात आलेल्या सरकत्या जिन्याच्या कामास 2019 ला मंजुरी मिळाली असून याचे काम सप्टेंबर 2020 मध्ये सुरू करून मार्च 2021 पर्यंत काम पूर्ण करण्यात आले होते. परंतु कोव्हीड-१९ मुळे रेल्वे मंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे सर्व पादचारी पूल बंद असल्याने याचे काम सुरू होण्यास विलंब लागत होता. वारंवार पाठपुरावा करून आज सरकते जिने सुरू करण्यात आले आहेत. या सरकत्या जिन्यासाठी 1कोटी 80 लाख निधी खर्च करण्यात आलेला आहे.

Related posts

नवी मुंबई म्हापे ते शीलफाटा पर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांना ट्राफिक ला सामोरे जावे लागते

अखेर नवी मुंबई मेट्रोला मुहूर्त मिळाला!

*मालमत्ता करावरील २०० टक्के व्याजदर शास्ती कमी करण्याची मागणी; थकीत वसुलीसाठी अभय योजना राबविण्याचा प्रस्ताव*

Leave a Comment