Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूज

वाशी वाहतूक शाखेची प्रभावी मोहीम — २७९ प्रकरणे न्यायालयात, दंडाची मोठी वसुली; धोकादायक स्टंट करणार्‍यांवरही कडक कारवाई

वाशी वाहतूक शाखेची प्रभावी मोहीम — २७९ प्रकरणे न्यायालयात, दंडाची मोठी वसुली; धोकादायक स्टंट करणार्‍यांवरही कडक कारवाई

नवी मुंबई (जनतेचा सावधान महाराष्ट्र)

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वाशी वाहतूक शाखेतर्फे दि. ०१ नोव्हेंबर २०२५ ते दि. ११ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहिम राबविण्यात आली. मा. पोलीस उप आयुक्त (वाहतूक) श्री. तिरूपती काकडे यांच्या आदेशाने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे पार पडली.

या विशेष कारवाईत २६५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून एकूण २,१७,००० रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच १२५,९५० रुपये प्रलंबित चलन वसूल करण्यात आले.

मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कठोर पावले उचलण्यात आली —
• दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ४ व्यक्तींवर कारवाई
• २७९ वाहनचालकांविरोधात न्यायालयात खटले दाखल
• २३ वाहनचालकांच्या परवान्यांचे निलंबन प्रस्तावित

सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी खाजगी वाहनांवर धोकादायक स्टंट करणाऱ्या काही युवकांविरोधातही कठोर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्यावर प्रचलित कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून प्रकरण न्यायालयात पाठविण्यात आले आहे.

याशिवाय, वाशी परिसरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये वाहतूक विषयक जनजागृती कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतूक संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्यात आले. धोकादायक स्टंट केल्यास कायदेशीर कारवाई होईल, याबाबत तरुणांमध्ये विशेष जागृती करण्यात आली.

तसेच दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीत वाहनचालकांनी आपले प्रलंबित दंड वेळेत भरण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

वाशी वाहतूक शाखेची ही सक्रिय, शिस्तबद्ध आणि जनहिताची कारवाई नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लक्षणीय ठरत असून, वाहतुक शिस्त प्रस्थापित करण्यासाठीचा हा प्रयत्न व्यापक स्तुत्य मानला जात आहे.

Related posts

वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्य करण्याची संधी लाभल्याचा अभिमान ! नवी मुंबई अध्यक्ष-राजेंद्र बोडके

jantechasavdhanmaharashtra

जाचकवाडी ग्रामस्थांनी लोकसहभागातून साकारली डिजिटल शाळा

jantechasavdhanmaharashtra

नवी मुंबई पोलिसांनी करोडोचा गुटखा सप्लाय करणाऱ्या आरोपींना केले जेर बंद!

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment