
नवी मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात घणसोली येथे गुरुश्याम हॉटेल मध्ये साजरा करण्यात आला दशरथ चव्हाण हे मूळचे शिव जन्म भूमी मधील जुन्नरचे व मुळगाव प्रसिद्ध असणारे वडजचे खंडोबा या गावचे ते रहिवासी असून नोकरी व्यवसाय निमित्ताने नवी मुंबई येथे अनेक वर्षापासून स्थायी झाले आणि नोकरी व्यवसाय बरोबर सामाजिक बांधिलकी जपत,ते गेले दहा ते बारा वर्षापासून समाज हितासाठी काहीतरी केले पाहिजे हा दृष्टिकोन लक्षात घेता त्यांनी अनेक विविध सेवाभावी संस्थांमध्ये काम केली व देशात चौथा स्तंभ असणारे पत्रकार क्षेत्रातही त्यांनी अनेक वर्षापासून काम करत असताना समाज हिताचे प्रश्न मार्गी लावले मग ते शाळे संदर्भात मुलांची फी वाढ कमी करण्या संधरबातअसो, आरोग्य विषयी अनेक तरुणांच्या नोकरी विषयी असो असे अनेक प्रश्न त्यांनी पत्रकारते मधून मार्गे लावले नवी मुंबईमध्ये पत्रकार क्षेत्रामध्ये त्यांनी आपला कामाचा ठसा उमटवत आपल्या जन्मभूमीमध्येही अनेक वेळा अनेक विषयावरती आवाज उठवून अनेक प्रश्न मार्गी लावले ग्रामीण भागातून आलेला एक तरुण नवी मुंबईमध्ये आपले व्यवसाय अस्तित्व निर्माण करत असताना सामाजिक बांधिलकी जपत पत्रकार क्षेत्रातही त्यांचे मोठे नाव झाले, त्यांच्या या कामाची दखल घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने काही महिन्या पूर्वी त्यांची नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी निवड केली, अशा या समाज उपयोगी व्यक्तीचा वाढदिवस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नवी मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांनी साजरा करत असताना आनंद व्यक्त करत आपले समाज उपयोगी स्नेही जिवलग मित्र दशरथ चव्हाण यांना शुभेच्छा देत असताना पत्रकार क्षेत्रातील त्यांचे समाज्या साठी असणारी तळमळ लक्षात घेता असेच समाज हितासाठी योगदान पुन्हा पुन्हा लाभो हीच सदिच्छा आणि शुभेच्छा त्यांना पत्रकार संघटनेतील सर्व सदस्यांनी दिली यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य राजू मीर यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला त्यांनाही सर्व संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय कार्याध्यक्ष- राजेंद्र बोडके, नवी मुंबई माजी- अध्यक्ष कुंडलिक कानगुडे, दलित पॅंथर चे जिल्हाध्यक्ष- सुनील गायकवाड, बहुजन समाज पार्टीचे नवी मुंबई प्रभारी- राजेश जैस्वाल,नवी मुंबई सचिव प्रवीण हांडे , पदाधिकारी -दिनकर गायकर ,अशोक काळे, दीपक सोनवणे ,अशोक लांडगे, खंडू घुले, मंगेश कदम ,बाबा सांघळे, एखंडे,
शिवशक्ती विद्यार्थी वाहतूक संघटनेचे उपखजिनदार- दिलीप लांडे उपस्थित होते

