Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमदेशब्रेकिंग न्यूज

*कोपरखैरणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; वाहनचोराच्या मुसक्या आवळत २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत*

*कोपरखैरणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; अल्पवयीन वाहनचोराच्या मुसक्या आवळत २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत*

प्रतिनिधी:- जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबई : कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यात कोपरखैरणे पोलिसांना मोठे यश मिळाले असून, अवघ्या १७ वर्षांच्या विधिसंघर्षग्रस्त बालकाकडून तब्बल तीन चोरीच्या मोटरसायकली व सात मोबाईल फोन असा एकूण सुमारे २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे परिसरात नियमित गस्त सुरू असताना, डी.बी. अधिकारी एपीआय अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. स्टाफ हवालदार कीर्वे (बॅ. ११९७), हवालदार कोल्हे (बॅ. १४१४), हवालदार चिकणे (बॅ. १०५४), पोलीस शिपाई सोलनकर (बॅ. ३२१३), पोलीस शिपाई जाधव (बॅ. १२४६४) व पोलीस शिपाई डोंबाळे (बॅ. १२०२८) हे परिसरात गस्त घालत होते.

याचदरम्यान गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, कोपरखैरणे बोनकोडे गावात चोरी केलेल्या मोटरसायकलचा चोर हा विधिसंघर्षग्रस्त बालक असून तो सध्या घणसोली रेल्वे स्टेशनच्या शेजारी फिरत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित बालकास ताब्यात घेतले.

तपासादरम्यान सदर बालकाने आपले वय १७ वर्षे, राहणार खैरणे गाव, कोपरखैरणे, नवी मुंबई असल्याची माहिती दिली. सखोल चौकशीत त्याने बोनकोडे परिसरातील मोटरसायकल चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी केलेल्या एकूण तीन मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या.

यामध्ये कोपरखैरणे पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ६२/२०२६ मधील अ‍ॅक्टिव्हा मोटरसायकल (एमएच-२२ डब्ल्यू ४८६९) किंमत अंदाजे ४० हजार रुपये, वाशी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ५२/२०२६ मधील एनटॉर्क १२५ मोटरसायकल (एमएच-०६ की ३०८५) किंमत अंदाजे १ लाख रुपये तसेच हिल लाईन पोलीस ठाणे, उल्हासनगर गुन्हा क्रमांक ३७/२०२६ मधील पल्सर एनएस-२०० मोटरसायकल (एमएच-०५ डीजे ४३७४) किंमत अंदाजे ७० हजार रुपये यांचा समावेश आहे.

यासोबतच चोरीचे सात मोबाईल फोन अंदाजे ७० हजार रुपये किमतीचे हस्तगत करण्यात आले असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख ८० हजार रुपये इतकी आहे.

कोपरखैरणे पोलिसांच्या या तत्पर, नियोजनबद्ध आणि प्रभावी कारवाईमुळे वाहनचोरीच्या गुन्ह्यांवर मोठ्या प्रमाणात अंकुश बसला असून, नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास कोपरखैरणे पोलीस ठाण्याकडून कायदेशीर पद्धतीने सुरू आहे.

Related posts

म रा मराठी पत्रकार संघ नवीमुंबईची कार्यकारणी जाहीर

jantechasavdhanmaharashtra

शासकीय योजनांमध्ये पत्रकारांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार..

jantechasavdhanmaharashtra

*कोपरखैरणे पोलिसांची साखळी चोरी प्रकरणात मोठी कामगिरी — ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment