Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमजिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

*मॅग्नेट ऑर्केस्ट्रा बारवर वाशी पोलिसांचा छापा! महिला वेटरसह ५ जण ताब्यात*

*मॅग्नेट ऑर्केस्ट्रा बारवर वाशी पोलिसांचा छापा! महिला वेटरसह ५ जण ताब्यात*

*नवी मुंबई वाशी जुहुगाव येथील मॅग्नेट ऑर्केस्ट्रा बारमध्ये महिला वेटर्सकडून अश्लील हावभाव सुरू असल्याची तक्रार वाशी पोलिसांना प्राप्त झाली होती.*

नवी मुंबई : (प्रतिनिधी) नवी मुंबई पोलिसांनी ऑर्केस्ट्रा बारमध्ये नियम बाह्य पद्धतीने चालणाऱ्या कृत्यावर आळा घालण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. या अनुषंगाने वाशी जुहुगाव येथील मॅग्नेट ऑर्केस्ट्रा बारवर रात्री उशिरा धाड टाकून पोलिसांनी अश्लील हावभाव करणाऱ्या महिला आणि बारमधील कामगारांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.
वाशी जुहुगाव येथील मॅग्नेट ऑर्केस्ट्रा बारमध्ये महिला वेटर्सकडून अश्लील हावभाव सुरू असल्याची तक्रार वाशी पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार वाशी पोलिसांनी सदर बारवर धाड टाकून कारवाई केली. या धाडीत बारमधील ४ महिला वेटर आणि नर्तकी यांच्यासह १ पुरुष मॅनेजर धर्मा शिवल गौडा अशा एकूण ५ जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आली असून नियमबाह्य पद्धतीने बार सुरू ठेवल्यास कारवाई आणखी तीव्र केली जाईल अशी माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांनी दिली आहे. जुहुगाव सेक्टर ११ मधील मॅग्नेट ऑर्केस्ट्रा बार अँड रेस्टारंन्टमध्ये महिला नर्तकी वाद्यवृंद संगीताच्या नावाखाली अश्लील वर्तन करीत असल्याने ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी सदर बार मॅनेजर आणि महिला वेटर यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशी पोलिसांच्या या कारवाईमुळे इतर बार चालकांचे देखील धाबे दणाणले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या २० तारखेला होणार असल्याने शनिवार, रविवार, सोमवार हा ड्रायडे घोषित केल्याने सर्वच बार, वाईन शॉप, बिअर शॉप हे बंद असणार आहेत.
मात्र तरी देखील तुर्भे, नेरुळ ,सानपाडा,घणसोली,ऐरोली, आशा अनेक ठिकाणी आस्थापना मागच्या दरवाजाने मद्य विक्री करत असल्याचे हमखास दिसून येते. त्यावर देखील कारवाई करणाची मागणी नागरिक करत आहेत. तर अजूनही शहरात उशिरापर्यंत सुरु असल्याने पोलिसांनी त्यावर देखील कारवाई करण्याचा सुर नागरिकांमध्ये उमटत आहे.

वाशी पोलिसांच्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे व त्यांचे पोलीस कर्मचारी यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले आहे

आणि अशीच कारवाई बाकी विभागांमध्ये चालणाऱ्या अनारधिकृत पणे चालणाऱ्या आर्केस्ट्रा आणि डान्सबार वरती करण्यात यावी असे नवी मुंबईतील नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे अनेक हॉटेलमध्ये प्रमाणापेक्षा जास्त मुली असतात आणि कारवाईची भनक लागताच मागच्या दरवाज्याने मुलींना गायब केले जाते. ही जबाबदारी फक्त पोलिसांची नसून एक्साईज डिपार्टमेंटची सुद्धा आहे एवढं सर्व होत असताना एक्साईज डिपार्टमेंट दुर्लक्ष का करत आहे असाही प्रश्न नागरिकांना पडत आहे.

Related posts

नामदार श्री बाळासाहेब थोरात  महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व आमदार डॉ श्री सुधीरजी तांबे  यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेचे गटनेते श्री अजय भाऊ फटांगरे  यांच्या पुढाकाराने आज बोटा कोविड सेंटर पुन्हा चालू करण्यात आले

jantechasavdhanmaharashtra

वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या कामगिरी बद्दल पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली सदिच्छा भेट व शुभेच्छा

नवी मुंबई परिवहन कार्यालयाचे चाचणी केंद्र नेरूळ येथे उपलब्ध करण्यात यावे ! निलेश कचरे

Leave a Comment