Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमजिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

नवी मुंबई – सानपाडा रेल्वे स्थानकावर बापानेच केली 4 वर्षीय मुलाची हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

                     नवी मुंबई (कासिम अली सैय्यद)

नवी मुंबई : दुसऱ्या पत्नीशी झालेल्या वादातून सानपाडा रेल्वे स्टेशन वरील फलाट क्रमांक तीन वर स्वतःच्या चार वर्षीय मुलाचे तीन वेळेस डोके आपटून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे तुम्ही पाहू शकतो कसा प्रकारे फलाट क्रमांक 3 वर एक लहान मुलाला आपटून आपटून त्याची हत्या करण्यात आली हत्या करणाऱ्या बापाला वाशी जीआरपी यांनी अटक केली आहे.सकलसिंग पवार अटक आरोपचे नाव आहे .

सानपाडा रेल्वे स्टेशनवर फलाट क्रमांक 3 व 4 दरम्यान प्रकार घडला आहे. मूळच्या यवतमाळ येथील भटक्या कुटुंबातील असून सानपाडा पुलाखाली राहते होते भीक मागून गुजराण करत होता. आरोपी सकलसिंह पवार आणि पत्नीचे नेहमी वाद होता त्यादिवशी भांडण करत असताना रेल्वे स्थानकावर पोहचले यावेळी फलाटावर सर्व जण एकत्र चालत असताना, सकलसिंग पवार याचा पत्नीसोबत वाद सुरू होता. या वादातून त्याने स्वतःचा चार वर्षांचा मुलगा प्रशांत याला उचलून फलाटावर आपटले. यावेळी व्यक्तींनी त्याला अडविण्याचाही प्रयत्न केला, परंतु तो सतत मुलाला उचलून अडविण्याचाही प्रयत्न केला, परंतु तो सतत मुलाला उचलून जोराने खाली फेकत होता. तुम्ही सीसीटीव्ही मध्ये पाहू शकता कसा प्रकारे पल्या मुलाला उचलून खाली फेकक्त होता अखेर हा क्रूर प्रकार पाहून एका प्रवासी महिलेनेही त्याला अडवून मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही सकलसिंग हा चिमुकल्याला उचलून आपटत राहिल्याने, त्यातच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी सकलसिंग पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मृत प्रशांत हा सकलसिंगच्या पहिल्या पत्नीपासूनचा मुलगा आहे. त्याची पहिली पत्नी गावी असून, तो सध्या दुसरी पत्नी मेहेर हिच्यासोबत नवी मुंबईत सानपाडाला राहत आहे. रविवारी रात्रीपासून सकलसिंग याचा दुसरी पत्नी मेहेर हिच्यासोबत वाद सुरू होता. सोमवारी सकाळी सर्व जण सानपाडा स्थानकात आले असता, त्या ठिकाणीही त्यांचा वाद सुरू होता. याच रागातून सकलसिंग याने मुलगा प्रशांत याला उचलून आपटून त्याची हत्या केली. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आल्याचे माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर यांनी दिली आहे।

 

Related posts

*सिडकोच्या कळंबोली नोडमध्ये अतिक्रमण विरोधी मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी*

जुन्नर येथे अनोख्या पद्धतीने सुपर मार्केटचे उदघाटन*

jantechasavdhanmaharashtra

*दिघा रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करायचे नसेल तर ती जागा लग्न समारंभ वाढदिवसासाठी भाड्याने देण्यात यावी!*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment