**वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्य करण्याची संधी लाभल्याचा अभिमान – नवी मुंबई अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र बोडके यांनी व्यक्त केला**
**नवी मुंबई** : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई या प्रमुख पत्रकार संघटनेच्या *नवी मुंबई अध्यक्षपदी* माझी निवड झाल्याबद्दल मी संघटनेचे *प्रदेशाध्यक्ष मा. वसंत मुंडे सर* तसेच *प्रदेश संघटक मा. नितीनजी शिंदे* यांचे मनःपूर्वक आभार मानतो. संघटनेने माझ्यावर दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी केवळ सन्मान नाही तर एक मोठी जबाबदारी आहे.

प्रदेशाध्यक्ष *वसंत मुंडे सरांच्या* नेतृत्वात कार्य करण्याची संधी मिळणे, ही माझ्यासारख्या सर्वसामान्य पत्रकारासाठी गौरवाची बाब आहे. त्यांच्या नेतृत्वात राज्यभर राबविण्यात आलेली *‘जनसंवाद यात्रा’* ही पत्रकारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली. या यात्रेद्वारे पत्रकारांनी समाजहितासाठी लेखणीचा प्रभावी उपयोग कसा करावा, याचे सशक्त मार्गदर्शन मिळाले.
या उपक्रमाची दखल घेत *महाराष्ट्र शासनाने* पत्रकार महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली. *मा. वसंत मुंडे सरांच्या* मार्गदर्शनाखाली ही यात्रा यशस्वीपणे पार पडली आणि त्यातून पत्रकारांच्या विविध समस्यांवर ठोस उपाययोजना सुचवण्यात आल्या.
मी, *राजेंद्र बोडके* या संघटनेतर्फे नवी मुंबईतील सर्व पत्रकारांचे प्रश्न आणि अडचणी योग्य पद्धतीने व प्रभावीपणे वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आणि त्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देतो.
याशिवाय, *कोकण विभागाचे कार्यक्षम संघटक मा. नितीन शिंदे सर* यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कोकण विभागातील पत्रकारांचे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वासही व्यक्त करतो.
माझ्या निवडीबाबत संघटनेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानतो. मी आणि माझ्यासोबत संपूर्ण कार्यकारी मंडळ ही जबाबदारी पार पाडण्यासाठी कटिबद्ध आहोत.
**– राजेंद्र बोडके**
*नवीन नियुक्त अध्यक्ष, नवी मुंबई*
*महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई*
–

