Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

शितल फापाळे हीचा mpsc ओबीसी महिला प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक

प्रतिनिधी सतीश फापाळे

बोटाः अकोले तालुक्याचे पठार भागातील शेवटचे टोक समजल्या जाणाऱ्या जाचकवाडी खेड्यातील शितल हि मुलगी जाचकवाडी गावचे कर्तव्य निष्ठ पोलिस पाटील म्हणुन ज्यांची ख्याती आहे असे पोलिस पाटील शिवाजी जनार्दन फापाळे यांची मुलगी शितल शिवाजी फापाळे तसेच संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा गावचे अगस्ती कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक भिकाजी शंकर जाधव यांची सूनबाई शितल सुनीत जाधव.यांनी 2019 साली महाराष्ट्र पब्लीक सर्विस कमिशन (MPSC) परीक्षा दिली होती .त्या परीक्षेचा निकाल दि.८ मार्च २०२२ रोजी जागतिक महिला दिनी लागला या निकालात ओबीसी महिला (OBC) प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक तर (OPEN) ओपन महिला प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यात नववा क्रमांक मिळवून (PSI) पोलिस सब इन्स्पेक्टर पदवी मिळवली आहे.

कु. शितल शिवाजी फापाळे यांचा शैक्षणिक प्रवास सन १९९८ पासून अगदीच खेड्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाचकवाडी येथून मराठी माध्यमातून इयत्ता पहिली ते चौथी वर्ग असा सुरू झाला .तर इयत्ता पाचवी ते दहावी सन २००२ पासून रोकडेश्वर माध्यमिक विद्यालयात शिक्षण झाले. इयत्ता दहावी मध्ये सन २००६/२००७ च्या बॅच मध्ये ७४.७६ टक्के मिळवत आंबी दुमाला विद्यालयात प्रथम क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली. पुढे उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी सन २००७ पासून सह्याद्री कॉलेज संगमनेर येथे विज्ञान शाखेतून प्रवेश घेत सन २००९ साली उत्तीर्ण झाली.त्यानंतर सन २०१० पासून पदवीधर शिक्षण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पिंपरी चिंचवड आकुर्डी पुणे येथे प्रवेश घेऊन सन २०१३ पूर्ण केले.
सन २०१४ ते २०१७ पर्यंत पुणे येथील कायनेटिक कम्युनिकेशन कंपनीत नोकरी करत असताना बोटा गावचे अगस्ती विद्यालय अकोले येथील निवृत्त प्राध्यापक भिकाजी जाधव यांचे चिरंजीव सुनीत जाधव यांचेशी एप्रिल २०१६ साली विवाह झाला. २०१७ साली शितल यांचा भाया संदीप जाधव (S.T.I) राज्य कर निरीक्षक यांचे मार्गदर्शन आणि त्यांचे पती सुनीत जाधव यांचे साथीने त्यांनी २०१७ सालापासून यांचे मार्गदर्शन.तसेच पतीची आणि सासरची साथ मिळवून २०१८ साली महाराष्ट्र पोलिस सब इन्स्पेक्टर (PSI)परीक्षा दिली परंतु त्यात त्यांना अपयश आले.म्हणतात ना अपयश हि यशाची पहिली पायरी असते.हेच मनी बाळगून आपले भाया, पती,सासरे यांचे मार्गदर्शन आणि आई वडिलांचा आशीर्वाद पाठीशी ठेवून प्रयत्नांची पराकाष्ठा करत. प्रयत्नाशि वाळूचे कण रगडीता तेलही गळे या उक्तीप्रमाणे त्यांनी सन २०१९ पर्यंत कठीण परिश्रम घेत सन २०१९ साली पून्हा (MPSC) महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशनची परीक्षा दिली.

सन २०२२ रोजी ८ मार्च जागतिक महिला दिनी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि या परीक्षेत शितल शिवाजी फापाळे हीचा (OBC) ओबीसी महिला प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.तसेच (OPEN) ओपन महिला प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यात नववा क्रमांक पटकावला आहे .

शितल हीचा शैक्षणिकदृष्ट्या प्रवास पाहता अगदी मराठी माध्यम ते(MPSC) महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन परीक्षा पास करत (PSI)पोलिस सब इन्स्पेक्टर पदी निवड झाली आहे. याबाबत अकोले तालुका तसेच महाराष्ट्र राज्यातून शितल फापाळे हीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पुढील वाटचालीस देखील शुभेच्छानचा वर्षाव होत आहे.

शितल हीचा शैक्षणिकदृष्ट्या प्रवास पाहता अतिशय खडतर प्रवास होता.ग्रामीण भागातील मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन पि.एस .आय पदापर्यंत संघर्ष करत तिने आपले ध्येय गाठले आहे. शितलचा एकूणच हा प्रवास इतर मुलींना देखील प्रेरणादायी ठरला आहे.

Related posts

स्व.अण्णासाहेब पाटील यांची जयंती APMC कांदा बटाटा मार्केट येथे साजरी

jantechasavdhanmaharashtra

समाजसेवक निलेश कचरे यांच्या पाठपुराव्याला यश; सानपाड्यात पोलीस चौकी पुन्हा सुरू,

कश्मीर हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तत्पर मदत; शेकडो पर्यटकांना सुखरूप परत आणलं

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment