Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

कल्याणपूर्व येथील मनोज गुप्ता यांनी सामान्य नागरिकांची केली करोडो रुपयांची फसवणूक ! गुन्हा दाखल

सुबोध सावंत -प्रतिनिधी

कल्याणपूर्व तिसगाव येथील पूनर्वसन च्या नावाखाली केली सामान्य नागरिकांची करोडो रुपयांची फसवणुक आयुष इन्फ्राक्स्ट्रक्चर चे मालक मनोज नायब गुप्ता यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

कल्याण :दि.26 कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे .त्यात कुठलाही राजकीय पक्ष मागे नाही . सरकारी जागेवर अनधिकृत इमारत बांधकाम करणे ,आरक्षित भूखंड गिळंकृत करणे , महारेरा रजिस्ट्रेशन असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करून महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकारी यांना हाताशी घेऊन एका इमारतीचा नकाशा मंजूर करून घ्यायचा व त्यापेक्षा जास्त ठिकाणी त्याचा गैरवापर करून इमारती बांधकामाचा सपाटा लावणे. तसेच विविध विभागाच्या ही परवानगी न घेता इमारत बांधकामांचा धडाका लावला आहे भूमाफियानि. मुंबई मध्ये पत्रा चाल मधील नागरिकांची काही वर्षांपूर्वी घरांच्या पुनर्वसन च्या नावाखाली जशी फसवणूक झाली होती .तसाच काहीसा प्रकार कल्याण पूर्वेतील तीसगाव येथील आयुष्य इन्फ्राक्स्ट्रक्चर चे मालक मनोज नायब गुप्ता यांच्या बाबतीत उघडकीस आला आहे .आयुष इन्फ्राक्स्ट्रक्चर चे मालक मनोज नायब गुप्ता यांनी आयुष इन्कलेव्ह च्या नावाखाली २०१३ साली ओम साई राम सोसायटी सोबत पुनर्व्हसन बाबत करार करून सोसायटी च्या चाळी तोडण्यात आल्या. मनोज नायब गुप्ता व राजेश कुमार शर्मा यांनी ८१ सदनिकाधारक यांच्या सोबत पूनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले तसा करार ही करण्यात आला . २०१९ पर्यन्त या गरिबांना घरे बांधून देण्याचे आश्वासन देऊन आज पर्यंत त्यांना घरे दिली नाहीत मनोज नायब गुप्ता व राजेश कुमार शर्मा या दोघांनी ओम साई राम सोसायटी मधील नागरिकांची घोर फसवणूक केली आहे. पुढे या दोघांनी संतोष गुप्ता यास आपल्या आयुष इन्फ्राक्स्ट्रक्चर या कंपनी मध्ये भागीदार करून घेतले व एक इमारत बांधकाम पूर्ण होण्याआधीच त्यातील काही घरे रोख स्वरूपात बाहेरील व्यक्तीस अवाजवी रक्कम घेत लाखो रुपयांत विकली व त्यातील काही जण रोख रक्कम देऊ शकले नाहीत म्हणून त्यांची घरे याच तिघांनी ओम साई राम सोसायटी मधील पदाधिकारी सचिव विकास शिवाजी जाधव यांच्यासह मिळून कारस्थान रचून बाहेरच्या लोकांना तेथील घरे विकली आहेत. त्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे बनवुन दुसऱ्यांना घरे विकल्याचे पोलीस तपासात आढळून दिसून आले आहे . जवळ जवळ १०० सदनिकाधारकांपैकी ३० ते ४० गरीब व गरजू नागरिकांची घरे परस्पर बाहेरील व्यक्तिक्स विकले आहेत. त्यात विकास जाधव यांना हाताशी धरून मनोज नायब गुप्ता यांच्या कडून सोसायटी मधील काही जणांचे घरे परस्पर दुसऱ्याच व्यक्तींना विकले आहेत . तसेच ओम साई राम सोसायटी मधील नागरिकांना २०१९ पासून ते आजपर्यंत ४.५ ते ५ कोटी रुपयांपर्यंतची भाडे थकवली आहेत. या सर्व प्रकरणी बाहेरील लोकांना घरे विकताना बनावट कागदपत्रे तयार करून कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच दुय्यम निबंधक कार्यलयाची ही दिशाभूल करत काही जणांकडून लाखो रुपये घेऊन घरांचे दस्त नोंदणी केली आहे . काही दिवसांनी ओम साई राम सोसायटी मधील काही नागरिकांना या घरे विक्री ची कुनकुन लागताच त्यांनी कोलशेवाडी पोलीस स्टेशन येथे आयुष इन्कलेव्ह चे मालक मनोज नायब गुप्ता यांच्या विरोधात तक्रार दाखल केली , कोलशेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद रजि क्रमांक ६७२/२०२३ कलम ४२०,४०६,४६५,४६७,४७१,१२० ब ३४ भा दं वि सह कलम ३,४ व ५ महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिका (बांधण्यास प्रोत्साहन देणे,व्यवस्थान व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत) अधिनियम १९६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे , या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा ठाणे यांच्या कडून करण्यात येत आहे .सर्व सोसायटी पुनर्वसन च्या नावाखाली जवळ जवळ १०० सदनिकाधारक यांची घोर फसवणूक करण्यात मनोज नायब गुप्ता सहित त्यांचे भागीदार यांच्यावर फसवणुकीबाबत मोफा अंतर्गत गुन्हा दाखल करून दिनांक २५/१०/२०२३ रोजी आर्थिक गुन्हे शाखा च्या तपास पथकाने संतोष कुमार यादव तसेच विकास शिवाजी जाधव यांना अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे . व या सर्व प्रकरणात इन्फ्राक्स्ट्रक्चर चे मालक मनोज नायब गुप्ता हे फरार आहेत व पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच मनोज नायब गुप्ता व राजेश कुमार शर्मा यास ही पोलिसांनी लवकर पकडावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे .

Related posts

नवी मुंबई पालिकेचीअनधिकृत होर्डिंग विरोधी कारवाई दुसऱ्या दिवशीही सकाळपासून पहाटेपर्यंत प्रभावीपणे सुरू

उपप्रादेशिक कार्यालय नवी मुंबई तर्फे वाहन चालकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

jantechasavdhanmaharashtra

*घणसोली प्रभाग क्रमांक 09 जोरात आणि नाव चर्चेत आहे राजू थोरात……*

Leave a Comment