*ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांचा जनतेचा सावधान महाराष्ट्रकडून विशेष सन्मान*
प्रतिनिधी :-जनतेचा सावधान महाराष्ट्र
जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी शासकीय, निमशासकीय तसेच प्रशासकीय क्षेत्रात कर्तव्यदक्षपणे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.
याच अनुषंगाने ओतूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांचा त्यांच्या उत्कृष्ट व कर्तव्यदक्ष सेवेसाठी जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राचे मुख्य संपादक श्री. राजेंद्र बोडके यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रतिनिधी कैलास बोडके
ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न विशेष उल्लेखनीय मानले जातात. चोरी, मारामारी, अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवत गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी प्रभावी कारवाई केली आहे. महिला सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, तसेच वाहतूक शिस्तीबाबत त्यांनी घेतलेली दक्षता परिसरात कौतुकास्पद ठरत आहे.
गणेशोत्सव, यात्रा, ग्रामसभा यांसारख्या संवेदनशील काळात स्थानिक नागरिकांशी समन्वय ठेवून शांतता व सुव्यवस्था राखण्यातही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलात प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि जबाबदारीने कार्य करणारे अधिकारी म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या सन्मान सोहळ्यावेळी उपस्थित मान्यवरांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

