Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूज

*पुणे शहरात कर्तृत्वाचा ठसा; आंबी दुमाला गावातील युवा उद्योजक हिरामण नरवडे यांना ‘उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार’*

*पुणे शहरात कर्तृत्वाचा ठसा; आंबी दुमाला गावातील युवा उद्योजक हिरामण नरवडे यांना ‘उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार’*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यातील आंबी दुमाला गावातील युवा उद्योजक हिरामण नरवडे यांनी पुणे शहरात आपल्या कर्तृत्वाच्या बळावर व्यवसाय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करत सामाजिक बांधिलकीही जपल्याने त्यांना “उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.

व्यवसायात प्रामाणिकपणा, मेहनत आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा सुंदर समतोल साधत हिरामण नरवडे यांनी अल्पावधीतच पुणे शहरात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतानाच सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

समाजातील गरजू घटकांना मदत, युवकांना प्रोत्साहन तसेच सामाजिक कार्यामध्ये सातत्याने योगदान दिल्यामुळे त्यांच्या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते त्यांना “उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी हिरामण नरवडे यांच्या जिद्द, मेहनत आणि सामाजिक भानाचे विशेष कौतुक करत ग्रामीण भागातील युवकांसाठी ते प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले.

पुरस्कार स्वीकारताना हिरामण नरवडे यांनी हा सन्मान आपल्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि समाजातील सर्व शुभेच्छुकांना समर्पित करत भविष्यातही सामाजिक कार्य आणि व्यवसाय क्षेत्रात अधिक जबाबदारीने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related posts

पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी समन्वयाने काम करणार प्रमोद डोईफोडे आणि वसंत मुंडे यांचा निर्णय

jantechasavdhanmaharashtra

केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणाऱ्यांना उत्पन्न करात वार्षिक पाच हजार रुपये सूट द्यावी

नवी मुंबई पालिकेचे अधिकारी प्रवीण गाडे हे कायदा पायदळी तुडवतात का?असा प्रश्न नागरिकांना पडत आहे 

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment