Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

कोपरखैरणे वाहतूक शाखेच्या वतीने आर एफ नाईक कॉलेज,मध्ये .ट्राफिक रुल्स कसे पाळायचे मार्गदर्शन

कोपरखैरणे प्रतिनिधी:-

कोपरखैरणे वाहतूक शाखेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी आर एफ नाईक कॉलेज, कोपरखैरणे. येथील विद्यार्थ्यांना अपघात कसे घडतात आणि अपघात कसे टाळता येऊ शकतात यासाठी आपण स्वतः व इतरांना ट्राफिक रुल्स कसे पाळायचे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करताना विद्यार्थांना सांगितले की,


वाहने नेहमी ट्रॅफिक सिग्नल नुसार चालवावे.
नेमही सर्वप्रथम रुग्णवाहिकेला मार्ग द्या.
वाहन हे नेमही डावीकडूनच चालवावे.
दोन वाहनांमध्ये नेमही योग्य अंतर ठेवावे.
पैदल रस्त्यावर चालताना नेमही झेब्रा क्रोससिंग वरच चालावे.

वाहन पार्कींग निर्बंध असलेल्या ठिकाणी वाहन लावू नका.

नेमही हेल्मेट व कार चालावताना सीट बेल्ट लावावा.

वाहन चालवताना दुसऱ्या वाहनाशी स्पर्धा करू नका.

गर्दीच्या ठिकाणी, चौफुलीवर किंवा यू टर्न घेताना स्पीड कमी ठेवा.

वरचे सर्व नियम हे प्रत्येक राज्यात वेगळे आहेत किंवा सारखे सुद्धा असू शकतात परंतु सर्वांनी हे नियम काटेकोर पने पाळले पाहिजे. आपण आपल्या व लोकांच्या सुरक्षितेसाठी या सगळ्या नियमांचे व सिग्नलचे पालन केले पाहिजे, जेणेकरून आपल्यासोबत व दुसर्यांसोबत कोणताहि वाईट अपघात होणार नाही. म्हणून आम्ही ट्रॅफिक सिग्नल आणि ट्रॅफिक रुल या विषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयन्त केला आहे. वाहनाचे व वाहतुकीचे हे नियम (रूल्स) पालन करून प्रवास केला तर आपला प्रवास नेहमी सुरक्षित व आनंदी होऊ शकतो. आणि देश अपघात मुक्त करू शकतो.

तसेच आपल्या मार्फतीने ट्राफिक अवेअरनेस कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे सदर वेळी 100 विद्यार्थी आणि कॉलेजचे मुख्याध्यापक हेही हजर होते.
सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी
सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे कोपरखैरणे वाहतूक विभाग यांचे आभार व्यक्त केले.

Related posts

*बेलापूर विभागात प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई*

जनतेच्या सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राच्या बातमीची दखल ! म्हसवंडीतील जीवघेणा प्रवास थांबण्याचीअपेक्षा.

jantechasavdhanmaharashtra

*१५ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या दोघांना दीड तासात कोपरखैरणे पोलीसांनी केली अटक; पीडित मुलाची सुखरूप सुटका*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment