Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

शिवछत्रपती को ऑप. पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

*शिवछत्रपती को ऑप. पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न



कोपरखैरणे प्रतिनिधी :- दिनांक 02-09-2023 रोजी शिवछत्रपती पतसंस्थेची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कै .आण्णासाहेब पाटील सभागृहात से.05 कोपरखैरणे येथे संपन्न झाली,सदर सभेचे अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष मारूती कोंडे यांनी भुषविले , प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक भरत नाईक, यशोमंदिर पतसंस्थेचे संचालक भानुदास आरोटे, ऍड जयसिंग बांगर अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष- शिंदे,,प्रमोद पाफाळे( कर्म नगरी )यांनी उपस्थित राहुन सभासदांना मार्गदर्शन केले, सर्व साधारण सभेचि सुरुवात दीप प्रज्वलन करुन झाली, दिंवगतानां श्रद्धांजली अर्पण करून यात संस्थेचे संचालक कै.बाळासाहेब पाबळे,संचालक शरद गाढवे यांच्या मातोश्री कै.सोनाबाई गाढवे, संचालक धनंजय पाटील यांचे वडील कै भास्करराव पाटील तसेच ज्ञात अज्ञात दिंवगतानां संस्थेच्या व सभासदांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करून सभेला सुरूवात केली, या प्रसंगी निधी विनियोग बाबत माहिती संस्थेचे संचालक धनंजय पाटील उपस्थित सभासदांना निधी गुंतवणूक विस्तृतवार सांगितले, दरवर्षी प्रमाणे यावर्षी हि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिस्त पत्र व भेटवस्तु देऊन गौरविण्यात आले, अध्यक्ष मारुती कोंडे यांनी संस्थेच्या आर्थिक स्थिती बाबत विस्तृत माहिती सभागृह समोर मांडली यात काहि अभ्यासक सभासदांच्या प्रश्ननां समर्पक अशि उत्तर अध्यक्षांनी दिली ,यात संस्थेचे मार्गदर्शक तथा माजी संचालक राजेंद्र बोडके यांनी चांगले असे मार्गदर्शन केले,व संस्थेची  प्रगतीअजून कशी होऊ शकते,  भानुदास आरोटे यांनी सभागृहात उपस्थित सभासदांना मर्गदशन केले, याप्रसंगी संस्थेचे माजी संचालक भगवान जाधव, कार्यकर्ते भिमराव हांडे दिलिप शेलार, सुनील चौधरी,सुनिल द्विवेदी,दिनकर वारुळे, भगवान पवार, सर्वज्ञ मोटार टेॢनिंग स्कुलचे भाऊसाहेब पाटील,अनिल टाकरकर (नेरुळ विभाग)असे सर्वच विभागातील बहुसंख्येने उपस्थित असलेले सभासदांच्या साक्षीने सभा संपन्न झाली, संस्थेचे अध्यक्ष मारूती कोंडे, उपाध्यक्ष श्री दिनकर गायकर, उपस्थित संचालक बाळशिराम फलके,शंकर लोहार,धनंजय पाटील,सौ अनिता गोंदके सौ वंदना शिंदे,सौ अनिता निकम तज्ञ संचालक विलास आरोटे व्यवस्थापक शशिकांत वाळुंज कर्मचारी वर्ग यानिं सभा यशस्वीपणे पार केली, वार्षिक सर्व साधारण सभेचे सुत्र संचालन राजाराम आरोटे सरांनी केले तर आभारप्रदर्शन धनंजय पाटील यांनी केले सभेची सांगता राष्ट्रगीताने केली

Related posts

*रबाळे पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन*

jantechasavdhanmaharashtra

यशोमंदिर सहकारी पतसंस्थेची निवडणूक यावेळी चुरशीची होणार?

कोपरखैरणे वाहतूक पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment