Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

आदर्श भारत घडवण्याचे काम विद्यार्थी नक्कीच करू शकतात!.. विश्वासराव आरोटे

 

आदर्श भारत घडवण्याचे काम विद्यार्थी नक्कीच करू शकतात/नाईकवाडी डी फार्मसी कॉलेज चे नाव गुणवत्ता यादीत आघाडीवर….विश्वासराव आरोटे.

नवी मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील गुणवंत गौरव सोहळा नुकताच संपन्न झाला यावेळी विविध क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त केलेल्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील नाईकवाडी डी फार्मसी या विद्यालयातील पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील नम्रता संतोष सोनवळे. दिशा शिवराम निपुत्रे. अपेक्षा संजय फुलसुंदर. सृष्टी संजय फुलसुंदर यांचा शाल श्रीफळ मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे.अकोले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार मैड पत्रकार संजय फुलसुंदर सौभाग्यवती सौ अर्चना फुलसुंदर यांच्या उपस्थितीत करण्यात आला . जिद्द व चिकाटीच्या जोरावर तरुणांनी यश प्रत्येकाच्या च्या पाठीमागे लपलेली असते यामुळे आपल्या आईवडिलांनी जो विश्वास ठेवून आपल्याला ज्या क्षेत्रात करिअर निवडायचे आहे त्या क्षेत्रात आपण आपले करिअर निवडावे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नये स्पर्धेच्या युगामध्ये ज्या क्षेत्रामध्ये आपले मन रमते त्या क्षेत्रामध्ये आपण आपलं करिअर घडवले पाहिजे यासाठी आपण देखील तेवढाच वेळ अभ्यासासाठी दिला पाहिजे नायकवडी डी फार्मसी कॉलेज मध्ये आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले राज्यात या डी फार्मसी विद्यालयाच्या गुणांकन व मानांकनात नेहमी वाढ झाली आहे राज्यभरातील नव्हे तर संपूर्ण देशभरातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी एक येत असतात त्यामुळे आपण देखील नक्कीच विद्यालयातून एक चांगले विद्यार्थी दहावीत हीच अपेक्षा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी व्यक्त केली मैत्री व त्या पलीकडे जाऊन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील आयुष्यभरासाठी आपले संबंध नेहमी चांगले राहावे यासाठी देखील आपण प्रयत्न केले पाहिजे माणसाची मने एकत्र आली तर नक्कीच उद्याचा आदर्श भारत घडू शकतो ही संकल्पना प्रत्येकाने राबवली पाहिजे सावित्रीबाई फुले यांचा आदर्श प्रत्येक मुलींनी मनात घेऊन उद्याचा महाराष्ट्र नव्हे तर भारत हा देश सुजलाम सुफलाम होण्यासाठी महिलांचा देखील तेवढाच वाटा राहिला आहे आपण ज्या विद्यालयात शिक्षण घेतो त्या विद्यालयाच्या प्रगतीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या कमाईतील एक रुपया दिला तर नक्कीच आपले भाऊ किंवा इतर बहिणी देखील या ठिकाणी या शिक्षणाच्या प्रवाहात नक्कीच आपले नाव घेतल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे कर्मभूमी जन्मभूमी या पलीकडे जाऊन शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तो घेणारा गुरगुललाच पाहिजे ही कल्पना प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी वे मनात घेतली पाहिजे असे मत विश्वास आरोटे यांनी व्यक्त केले यावेळी त्यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विशाल वाकचौरे तर आभार प्रदर्शन सौ अर्चना ताई फुलसुंदर यांनी मानले

Related posts

दिघागाव रेल्वे स्थानक सुरू करा… नाहीतर जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागेल – खासदार राजन विचारे*

jantechasavdhanmaharashtra

*नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेत मोलाचे योगदान देणाऱ्या कचरावेचक भगिनींसोबत दशरथ भगत यांनी साजरा केला भाऊबीज व दिवाळी सण*

अफगाणिस्तान: महासत्तांचा बळी (भय इथले संपत नाही…)

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment