Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

नवी मुंबई महानगरपालिकेचे काही माजी प्रतिनिधींची चालते मनमानी

नवी मुंबई महानगरपालिकेचे काही माजी प्रतिनिधींची चालते मनमानी


सहसंपादक:- अरुण बिराजदार

नवी मुंबई:- नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक अजून लागली नाही, परंतु आम्ही ते मानत नाही असं धोरण नवी मुंबई चे अनेक नगरसेवक वागताना दिसतात. कारण गेले दोन वर्षांपासून सर्व नगरसेवक हे माजी नगरसेवक आहेत ,

पण ते आजी नगरसेवक असल्या सारखे प्रशासना वर दबाव आणून काम करतात. आता ते समाजउपयोगी काम असेल तर ठीक आहे, पण ते नागरी सुविधांचे काम नव्हे तर मार्जितले माणसांना कामे देण्यासाठी अधिकारी वर्ग यांच्यावर दबाव निर्माण करणे, परंतु हे सगळं मा आयुक्त यांना माहीत असून अश्या तक्रारी ते दुर्लक्ष करतात हे दुर्दैवी आहे. जर आता सध्या कोण्हीच प्रतिनिधी नाही तर सर्व सामान्य समाजसेवक जर समाज्या साठी एखाद्या कामा बद्दल पत्र व्यवहार करत असेल तर त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली जाते आणि माजी नगरसेवक यांनी जर दबाव आणला तर त्यांची स्वफायद्याची कामे केली जातात हे कुठंतरी अन्याय कारक होते असा नागरिकांचा आणि समाजसेवकांचा आरोप आहे,
या विषयाकडे पालिका आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे ,

महापालिका आयुक्त सध्या प्रशासकीय अधिकारी म्हणून पूर्ण पणे काम बघतात तरी त्यांची कार्यपध्दती ही पारदर्शक व समानतेची असावी आणि त्यांनी नवी मुंबईच्या नागरिकाना विशेष सुविधा देऊन त्यांनी भरलेले कराचा पूर्णपणे मोबदला दिला पाहिजे.

आणि काही लोकप्रतिनिधी जर चुकीच्या पद्धतीने दबाव आणून काम स्वार्थी पोटी काम करण्यास भाग पाडत असतील तर त्यांच्यावर कार्यवाही करावी जेणेकरून ते नवी मुंबई मध्ये पालिका आणि प्रभाग म्हणजे त्यांच्या घरची मालमत्ता लोकप्रतिनिधी यांना वाटू नये. जेणे करून त्यांची एक नंबर ची दादागिरी पूर्ण पणे संपुष्टात येईल आणि समाज हितासाठी समाज उपयोगासाठी कायदेशीर मान्यतेला जास्त प्राधान्य मिळेल.

Related posts

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या दोन पक्षात  युती होण्याची शक्यता

jantechasavdhanmaharashtra

अकोले तालुक्यातील मन्याळे येथे  आईसह दोन मुलींची आत्महत्या

jantechasavdhanmaharashtra

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराने घेतले चार बळी.

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment