Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

वंडर्सपार्क त्वरीत सुरू करा.!!मा सभागृहनेते रविंद्र इथापे

*वंडर्सपार्क त्वरीत सुरू करा….*
नवी मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त *आयुक्त श्री राजेशजी नार्वेकरसाहेब* यांची आज *मा.सभागृह नेते श्री.रविंद्र इथापे* यांनी वाॅर्डमधील पदाधिकाऱ्यांसह सदिच्छा भेट घेतली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच गेले अडीच वर्षापासुन नवी मुंबईचा लॅण्डमार्क असणारा वंडर्सपार्क बंद आहे.कोरोना जाऊन बरेच दिवस झाले आहेत.लहान मुलांना लवकरच सुट्टया लागणार आहेत. वंडर्सपार्क मध्ये नव्याने राईडस व म्युझिकल फाऊंटन वुईथ लेझर शोचे देखील काम पुर्ण झाले आहे.स्टॅम्प काँक्रिटचे कामदेखील संपत आले आहे. वंडर्सपार्क बाहेर केबल डक्टचे कामदेखील युध्द पातळीवर पुर्ण करावे तसेच छोटी-मोठी राहिलेली कामे आपण संबंधिताची बैठक घेऊन त्वरीत संपवावीत व *दिवाळीपूर्वी वंडर्सपार्क सुरू करावा. अशी जोरदार मागणी रविंद्र इथापे यांनी केली*. यावर सर्वकष विचार करून आपण वंडर्सपार्क दिवाळीत सुरू करू असे आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांनी आश्वासित केले.
शिष्टमंडळात भाजपा तालुकाउपाध्यक्ष श्री.रविंद्र हांडे,श्री भालचंद्र माने,श्री अतुल पांडे,श्री शहानवाज खान व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related posts

हे शासन उद्योगांना सर्वोतोपरी मदत करणारे* *- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

jantechasavdhanmaharashtra

*शंकर गायकर यांची नर्मदा माता पायी परिक्रमा यशस्वी; सांगता सोहळा व कन्यापूजन*

*कोपरखैरणे पोलीस ठाण्यांतर्फे सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम राबविण्यात आला*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment