एकीकडे पाऊस थांबायला मागत नाही, तर दुसरीकडे नळाला पाणी येत नाही !!
कोपरखैरणे प्रतिनिधी देशा मध्ये नवी मुंबई एक सुंदर शहर म्हणून ओळखले जाते अनेक वेळा स्वच्छते मध्ये पण पारितोषिके मिळाली कोट्या वधी रुपयांचा खर्च केला गेला पण दुसरीकडे पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित राहिला? त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे, काही विभागा मध्ये अजून वेळेवर पाणी मिळत नाही, याचे ज्वलनंत उदाहरण म्हणजे कोपरखैरणे किती वेळ स्थानिक नागरिक, प्रतिनिधी ,समाजसेवक यांनी आवाज उठविला ,पण पालिका प्रशासनाला जाग आली नाही. पाऊस नव्हता त्यावेळेस कर्मचारी सांगायचे पाणी कपात आहे, आणि आता तर पाऊस थांबायला मागत नाही आणि कोपरखैरणे येथे सेक्टर 5, 6 या परिसरामध्ये पाणी यायला मागत नाही एकीकडे सांगितलं जातं बंधारे वाहून चाललेत आणि दुसरीकडे कोपरखैरणे विभागामध्ये अनेक लोकांना प्यायला पाणी नाही नक्की हा दुष्काळ कुठला समजायचा! ओला का सुका! नवी मुंबईत काही ठिकाणी भरपूर प्रमाणात पाणी सोडले जाते, आणि काही ठिकाणी 10 ते 15 मिनिटच पाणी येते तेही तुटपुंज, एका कुटुंबाला सुद्धा पुरेसे पडेनासे झाले ,मग हे पाणी का कमी पडते आपल्या धरणामध्ये पाणी नाही का फक्त काही विभागांमध्येच पाणी सोडण्याचा मानस पालिकेचा आहे हे स्थानिक नागरिकांना वाटते . स्थानिक नागरिक पाण्या वाचून त्रस्त झाले आहेत अनेक वेळा निवेदना दिली ऑनलाईन कंप्लेंटही केल्या तरीही पाण्यावरचे सोल्युशन कोपरखैरणे विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून भेडसावत आहे , कुठलीही ठोस भूमिका यावरती पालिका प्रशासन घेत नाही पालिकेमध्ये प्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासक म्हणून काम बघणारे अधिकारी टाळाटाळ करतात की काय असे स्थानिक नागरिकांना वाटते यावर लवकर तोडगा नाही निघाला तर येत्या काही दिवसांमध्येच हंडा आंदोलन करण्याचे कोपरखैरणे वासियांनी ठरवले आहे कित्येक वेळा वृत्तपत्र वृत्तवाहिनी सोशल मीडियाद्वारे पाण्यासंदर्भातले प्रश्न मानले गेले पण त्यावर कुठलाही ठोस मार्ग निघाला नाही नवी मुंबई सारख्या स्वच्छ शहरांमध्ये पाण्याचा प्रश्न काही ठिकाणी झोपडपट्टी पेक्षाही बेहतर आहे असे नागरिक बोलतात, कधी मिळणार पाणी ? कधी सुटणार पाण्याचा प्रश्न? सेक्टर 5 मध्ये तर किती दिवसापासून नाही तर वर्षापासून मार्ग काढलेला नाही त्यामुळे सेक्टर पाच मधील इमारतीमध्ये राहणारे सर्व नागरिक पाण्यापासून वंचित आहे की काय असे त्यांना वाटायला लागले आहे त्यामुळे यावर पालिकेने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंती पालिकेला सेक्टर 5 मधील स्थानिक नागरिकांनी केली आहे
नागरिकांनी ऑनलाइन कम्प्लेट दाखल केल्यानंतर त्याना फक्त फोन येतो बाकी सर्व कागदावरच राहते नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याच काम पालिका करत आहे ऑनलाइन कम्प्लेट फक्त ऑनलाईनच राहते आता पर्यंत कुठलाही मार्ग निघाला नाही






