Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराने घेतले चार बळी.

येठेवाडीत ह्रदयद्रावक घटना_ चार चिमुकल्या सख्या चुलत भाऊ मुलांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू.

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराने घेतले चार बळी.

प्रतिनिधी सतीश फापाळे संगमनेर

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावा अंतर्गत असलेल्या येठेवाडी परीसरातील वांदरकडा येथे तुटलेल्या विजवाहक तारेचा जोरदार धक्का बसल्याने एकाच कुटुंबातील चार चुलत भाऊ चिमुरड्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे.तरी महावितरण कंपनीचे कर्मचारी यांनी तुटलेली तार दुरुस्त करून जोडणी न केल्याने या लहानग्या मुलांना विजेचा धक्का बसून नाहक चार बळी गेले असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की येठेवाडी परिसरात वांदरकडा जवळ अजित बर्डे व अरुन बर्डे हे दोघे सख्खे भाऊ आपल्या कुटुंबासोबत राहत असून मोलमजुरी करून आपला उदर निर्वाह करतात.दोघे भाऊ व कुटुंब सकाळी मुले शाळेत गेल्यानंतर मोलमजुरीसाठी शेती कामाला गेले असता.त्यांची चार चिमुरडी मुले शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी आले .नंतर जवळच असलेल्या नाल्यावर आंघोळीसाठी गेले असता त्यांना तुटलेल्या विजेच्या तारेचा विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने विजेचा जोरदार धक्का बसला यात आठ वर्षीय दर्शन अजित बर्डे,सहा वर्षीय विराज अजित बर्डे, बारा वर्षीय
अनिकेत अरुन बर्डे, सात वर्षीय
ओमकार अरुन बर्डे या चार सख्ख्या चुलत भाऊ चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या दरम्यान जवळच परीसरात शेळ्या चारत असलेली त्यांची आज्जी अलकाबाई हौशीराम बर्डे यांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी जोरजोरात आरडाओरडा केला .या आवाजाने आजुबाजुच्या नागरीकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेत तातडीने घटनास्थळी आले.तत्काळ ही माहिती घारगांव पोलिसांना देण्यात आली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख जनार्दन आहेर,वायरमन विजय भालेराव, पोलिस निरीक्षक सुनील पाटील,पोलिस हेड कॉन्स्टेबल राजू खेडकर , राजेंद्र लांघे, प्रमोद चव्हाण,हरीचंद्र बांडे,तलाठी युवराजसिंग जारवाल यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले.रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने झोळीच्या साहाय्याने चारही मृतदेह रुग्णवाहिके पर्यंत पोहचवत उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.यावेळी हा हृदयद्रावक घटना पाहून काळजाचे तुकडे गेल्याने आई _वडिलांचे काळीज धायमोकलून रडू लागले होते.
यादरम्यान या घटनेची घारगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Related posts

वॉर्ड क्र 100 आर.आर.पाटील उद्द्यानाची म.न.पा अधिकारी यांनी केली पाहणी…

jantechasavdhanmaharashtra

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे जिल्हा व कोकण विभागानी सामाजिक बांधिलकी जपत अतिवृष्टी पावसामुळे पूरग्रस्तांना केली जीवणावशक वस्तूंची मदत

jantechasavdhanmaharashtra

आघाडी सरकार पाडण्याचे स्वप्न पाहणा-यांचा स्वप्नभंग निश्चित!!बाळासाहेब थोरात

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment