सहसंपादक:- अरुण बिराजदार
शिवाजी महाराज्यांच्या नावी अजून कुठं पर्यंत हे भ्रष्ट्राचारी लोकप्रतिनिधी राजकारण करतील
देशात अलीकडे जे राजकारण चालू आहे हे राजकारण बघता तुम्हाला वाटत असेल की आज ज्या पद्धतीचं गेल्या आठ वर्षापासून हे राजकारण चालू आहे त्या राजकारणामध्ये आणि पूर्वीच्या राजकारणामध्ये खूप अंतर राहिलेला आहे थोडक्यात पूर्वी लोकं शिवाजी महाराजांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यांच्या नावाचं राजकारणासाठी वापर केलं पण प्रत्यक्षामध्ये कोणत्याही एका राजकारणांनी शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असलेले जे कोणते गडकिल्ले किंबहुना त्यांच्या संबंधित असलेली कोणतीही ठिकाण तुम्ही बघा एकाही गोष्टीला योग्य प्रकारे या राजकारणांनी सुशोभीकरण करण्याचा काम असेल त्यांचे गडकिल्ले योग्य प्रकारे सांभाळण्याचा काम असेल हे केलेला नाही.
परंतु जातीवादी वरून आराध्य दैवत ज्यांना सगळ्या समूहाची लोकं हे मानतात अशा लोकांच्या नावाने राजकारण करून हे लोक प्रत्येक वेळेस आपल्या समाजातील लोकांचं दिशाभूल करत असतात आणि स्वतः त्या विषयाच्या आधारे मतदान घेऊन ते आमदार मंत्री असे बनवून आपल्याच डोक्यावर बसतात त्यानंतर परत जेव्हा पुढील निवडणूक लागते त्यावेळेस एका दुसरा विषयाला धरून ते परत तुमच्यासमोर येतात आणि परत तुम्हाला ते वारंवार एखाद्या विषयामध्ये गुंतवून तुमच्याकडून मतदान घेऊन ते त्या पदावर जाऊन पोहोचतात.
विषय असा की एकही राजकारणी व्यक्ती लोकप्रतिनिधी यांनी आजपर्यंत माझ्या प्रभागात मी एवढे संघर्ष करून त्या गोष्टी केल्या किंवा माझ्या मतदारसंघांमध्ये मी हे विकास काम केलं मी या बेरोजगारांना रोजगार दिलं मी वेगळं काही नागरिकांना जे योग्य ते त्यांच्या दैनंदिन गोष्टीला वापरण्यात येतील त्यावरती काही योग्य ते काम केलं जसे लाईट पाणी अशा काही गोष्टींमध्ये तर हे सगळं घेऊन ते कधीच आपल्यासमोर येत नाही पण निवडणुका आल्या हे प्रत्येक वेळेस जातीवादी एखाद्या विषयावरती जो विषय संवेदनशील असेल असे किंवा जो एखादा विषय समाजाच्या विरोधात किंवा समाजाच्या प्रती अशी काही असलेले ज्याने ना समाज सुधारू शकतो किंवा समाजातील लोक हे सुधारू शकतात असे विषय घेऊन हे लोकप्रतिनिधी आपल्याकडे येऊन मतदान घेतात त्यानंतर हे त्या पदावर जाऊन पोहोचतात ज्या पदावरती ह्यांची जाण्याची एक टके सुद्धा दूरदृष्टी अथवा बळ नसतो.

